गरिबांच्या 9999 Android फोनची iPhone 17 Air ने केली कॉपी? फक्त 19-20 चा फरक, तुम्हीच पाहा PHOTOS

Last Updated:

मोठा गाजावाजा करत apple ने iphone 17 ची सीरिज लााँच केली. यामध्ये iphone 17 air हा सगळ्यात स्लिम असा आयफोन आहे. पण, तुम्हाला जर apple ने एखाद्या अँड्राईड फोनची कॉपी केली असं म्हटलं तर?

News18
News18
मोबाईल क्षेत्रातली दादा कंपनी apple जे काही लाँच करेल त्याचा ट्रेंड बनून जातो. जर iphone मध्ये कॅमेऱ्याची डिझाईन बदलली तर सगळे अँड्राईंड फोन कंपन्या आपल्या स्मार्टफोनची डिझाईन बदलून टाकतात. apple ने एखादं दमदार फिचर फोनमध्ये दिलं तर अँड्राईंड कंपन्या सेम तसंच फिचर आपल्या फोनमध्ये देतात. हा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला ट्रेंड आहे. आता मोठा गाजावाजा करत apple ने iphone 17 ची सीरिज लााँच केली. यामध्ये iphone 17 air हा सगळ्यात स्लिम असा आयफोन आहे. पण, तुम्हाला जर apple ने एखाद्या अँड्राईड फोनची कॉपी केली असं म्हटलं तर? दचकू नका, असा प्रकार घडला असं आपण म्हणू शकतो. कारण, TECNO नावाचा एक अँड्राईंड फोन आहे, सेम त्याच्यासारखाच iphone air दिसतोय.
advertisement
TECNO नावाच्या कंपनीने अलीकडेच आपला स्वस्तात मस्त असा 5G स्मार्टफोन TECNO Spark Go 5G  लाँच केला होता. या फोनमध्ये  6000mAh बॅटरी, 8GB पर्यंत रॅम, 50 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 6.74 इंच 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले आणि शक्तिशाली मीडियाटेक डायमेन्सिटी 6400 चिपसेट दिला आहे. विशेष म्हणजे, हा फोन स्लिम आहे. 7.99mm रुंदी आणि  वजन फक्त 194g आहे. या फोनचा लूक सेम iphone air शी मिळता जुळता आहे.
advertisement
TECNO Spark Go 5G चे फिचर्स? 
TECNO Spark Go 5G मध्ये 4GB रॅम + 128GB स्टोरेज दिलं आहे.  भारतात या फोनची किंमत फक्त 9,999 रुपये ठेवण्यात आली आहे. मागील महिन्यात २१ ऑगस्टपासून हा फोन विक्रीसाठी सर्वत्र उपलब्ध आहे. TECNO Spark Go 5G फोन फक्त 7.99mm पातळ आहे आणि 6000mAh बॅटरी असूनही, तो त्याच्या सेगमेंटमधील सर्वात पातळ आणि हलका 5G स्मार्टफोन आहे. या फोनमध्ये IP64 धूळ आणि पाणी प्रतिरोधक तंत्रज्ञान आहे. हा स्काय ब्लू, इंक ब्लॅक, टरक्वाइज ग्रीन आणि हेरिटेज-प्रेरित बिकानेर रेड अशा चार रंगांमध्ये उपलब्ध करून दिला जाईल.
advertisement
TECNO Spark Go 5G स्मार्टफोनमध्ये 6.74-इंच 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले आहे, जो पाहण्याचा उत्तम अनुभव देईल. कामगिरीसाठी, त्यात MediaTek Dimensity 6400 चिपसेट आहे. तसेच 8GB RAM (4GB फिजिकल + 4GB व्हर्च्युअल) आणि 128GB स्टोरेज आहे. ऑपरेटिंग सिस्टमच्या बाबतीत, हा फोन HiOS 15 वर आधारित अँड्रॉइड 15 वर काम करतो.
advertisement
या डिव्हाइसमध्ये 50MP चा प्राथमिक कॅमेरा आहे, जो AIGC पोर्ट्रेट, व्हिडिओ, AI CAM, पोर्ट्रेट, सुपर नाईट मोड, टाइम-लॅप्स, ड्युअल व्हिडिओ, व्लॉग मोड, स्लो मोशन, स्काय शॉप, प्रो मोड, पॅनोरामा आणि डॉक्युमेंट स्कॅन सारखे फिचर्स आहे.  सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 5MP चा फ्रंट कॅमेरा आहे, जो AIGC पोर्ट्रेट, व्हिडिओ, AI CAM, पोर्ट्रेट, वाइड सेल्फी, टाइम-लॅप्स, ड्युअल व्हिडिओ आणि व्लॉग मोडला सपोर्ट करू शकतो.
advertisement
"नो नेटवर्क कम्युनिकेशन" मोड
चार्जिंग स्पीडबद्दल बोलायचे झाले तर, TECNO Spark Go 5G मध्ये 18W सपोर्ट आहे. तसंच 5G कॅरियर अ‍ॅग्रीगेशन आणि 4×4 MIMO तंत्रज्ञान आहे.  जे जलद आणि स्थिर नेटवर्क कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. इतकेच नाही तर फोनमध्ये "नो नेटवर्क कम्युनिकेशन" मोड आहे, जेणेकरून वापरकर्ते इच्छित असल्यास पूर्णपणे ऑफलाइन असताना देखील कनेक्ट होऊ शकतात.
advertisement
एवढंच नाहीतर या फोनमध्ये TECNO चा इन-हाऊस विकसित Ella AI असिस्टंट आहे, जो हिंदी, बंगाली, तमिळ, गुजराती आणि मराठी भाषांमध्ये प्रतिसाद देऊ शकतो. याद्वारे शोध, भाषांतर, लेखन आणि दैनंदिन कामे सोपी करता येतात.
किंमत किती? 
तुम्ही जर स्वस्तात 5G फोन खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर हा फोन बेस्ट आहे.  यामध्ये 5G सपोर्ट, मोठी बॅटरी आणि 10,000 रुपयांपेक्षा कमी किमती आहे. या फोनटी किंमत 9999 रुपये आहे.   TECNO Spark Go 5G 10,000 पेक्षा कमी किमतीत खूप पॉवरफुल फोन आहे.
आता iphone 17 air सेम कसा? 
ॲपलच्या apple event मध्ये नेहमीप्रमाणे नवीन फोनची सीरिज लाँच केली. यामध्ये सगळ्यात स्लिम असा iPhone 17 Air लाँच केला. हा आयफोन सगळ्यात स्लिम असल्याचं सांगितलं जात आहे. हा फोन फक्त 5.6mm इतका स्लिम आहे. iPhone 17 Air मध्ये 6.5-इंचाचा डिस्प्ले दिला आहे, जो 120Hz ProMotion रिफ्रेश रेट सपोर्ट करतो.  लॉक स्क्रीनवर हा रिफ्रेश रेट 1Hz पर्यंत कमी होतो, ज्यामुळे फोनची बॅटरी आणखी वाचणार आहे.
iPhone 17 Air मध्ये  फ्रंट आणि मागे  Ceramic Shield दिली आहे, त्यामुळे फोन पडला तरी काही होणार नाही, एवढंच फोनवर स्क्रॅच सुद्धा येणार नाही, असा दावा कंपनीने केला आहे.  पण, या फोनमध्ये एकच कॅमेरा दिला आहे. जो उत्तम फोटो आणि चांगले व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतो, असा दावा  Apple ने केला आहे.
या  फोनमध्ये Apple चं नवीन A19 Pro चीप लावण्यात आली आहे. जी स्मार्टफोन इंडस्ट्रीमध्ये सर्वात पॉवरफुल आहे ही चिप ऑन-डिवाआस AI प्रोसेसिंगला सपोर्ट करतोय, ज्यामुळे अॅप्स आणि गेम आरामात खेळता येईल.  iPhone 17 Air हा चार रंगात उपलब्ध आहे.  iPhone स्लिम आणि स्टायलिश श्रेणीची नवीन आहे.
iPhone 17 Air हा ज्या लोकांना बारीक आणि वजनाने हलका आणि हा. परफॉर्मेंस फोन पाहिजे आहे, त्यांच्यासाठी तयार केला आहे.  या फोनमध्ये 120Hz डिस्प्ले आणि A19 Pro चिप दिली आहे.
किंमत किती? 
iPhone 17 Air हा  apple चा सगळ्यात स्लिम असा iphone  आहे. आता स्लिम असेल म्हणून किंमतही तशीच आहे. या फोनची किंमत 256 GB साठी 1 लाख 19 हजार 900 रुपयांपासून सुरू होते, 512 GB ची किंमत 139900 रुपये इतकी आहे. तर 1 टीबीची किंमत 159900 रुपये इतकी आहे.
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
गरिबांच्या 9999 Android फोनची iPhone 17 Air ने केली कॉपी? फक्त 19-20 चा फरक, तुम्हीच पाहा PHOTOS
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement