WiFi राउटरच्या कलरफूल रंगांचा अर्थ काय? 99% लोकांना माहितीच नाही उत्तर

Last Updated:

WiFi Router: आजकाल प्रत्येक घरात इंटरनेट अ‍ॅक्सेस ही एक अत्यावश्यक सुविधा बनली आहे. तुमच्या घराच्या इंटरनेट स्पीड आणि कनेक्शन हेल्थचे पहिले संकेत म्हणजे तुमच्या वायफाय राउटरवरील रंगीबेरंगी लाइट्स.

वायफाय
वायफाय
WiFi Router: आजकाल प्रत्येक घरात इंटरनेट अ‍ॅक्सेस ही एक अत्यावश्यक सुविधा बनली आहे. तुमच्या घराच्या इंटरनेट स्पीड आणि कनेक्शन हेल्थचे पहिले संकेत म्हणजे तुमच्या वायफाय राउटरवरील रंगीबेरंगी लाइट्स. परंतु बहुतेक लोक या लाइट्सकडे दुर्लक्ष करतात, त्यांना फक्त सजावट समजतात. मात्र, हे दिवे तुमच्या इंटरनेट स्थितीबद्दल महत्त्वाची माहिती देतात.
लाल, हिरवा, निळा आणि पांढरा
WiFi राउटरमध्ये वेगवेगळ्या रंगाचे लाइट्स असतात. प्रत्येकाचा वेगळा अर्थ असतो. सर्वात सामान्य रंगांमध्ये हिरवा, निळा, लाल आणि कधीकधी पांढरा किंवा पिवळा यांचा समावेश होतो.
हिरवा: हिरवा लाइट म्हणजे तुमचे इंटरनेट कनेक्शन सामान्य आणि स्थिर आहे. हा लाइट सतत चालू असेल, तर तुमचा राउटर आणि इंटरनेट सुरळीतपणे काम करत आहेत.
advertisement
निळा: निळा लाइट सामान्यतः हाय-स्पीड डेटा ट्रान्सफर किंवा 5GHz कनेक्शन दर्शवतो. हा लाइट लुकलुकला तर याचा अर्थ डेटा अ‍ॅक्टिव्हपणे ऑनलाइन पाठवला किंवा प्राप्त केला जात आहे.
लाल: लाल लाइट हा एक चेतावणी चिन्ह आहे. हे अनेकदा इंटरनेट कनेक्शन समस्या, नेटवर्क डाउनटाइम किंवा राउटरमधील तांत्रिक बिघाड दर्शवते. हा लाईट सतत चालू असेल, तर तुम्ही तुमच्या ISP (इंटरनेट सेवा प्रदात्या) शी संपर्क साधावा.
advertisement
पांढरा/पिवळा: काही राउटर वाय-फाय सेटअप किंवा नवीन डिव्हाइस कनेक्शनची स्थिती दर्शवण्यासाठी या रंगांचा वापर करतात.
दिवे इंटरनेट स्पीडशी संबंधित
बरेच लोक असे मानतात की, राउटरवरील लाइट फक्त दाखवण्यासाठी आहेत. परंतु सत्य हे आहे की ते थेट इंटरनेट स्पीडशी संबंधित आहेत. उदाहरणार्थ, जर 5GHz नेटवर्कवरील निळा लाइट सतत लुकलुकत असेल, तर याचा अर्थ असा की डेटा हाय स्पीडने ट्रान्सफर होत आहे. तसंच, इंटरनेट अचानक कमी झाला आणि लाईट लाल किंवा खूप मंद झाला, तर ते वेग किंवा कनेक्शन समस्या दर्शवते.
advertisement
लाइट्समधून समस्या ओळखणे सोपे
राउटरच्या लाईट्स पाहून तुम्ही नेटवर्क प्रॉब्लम आहे की नाही हे सहजपणे ओळखू शकता. उदाहरणार्थ, तुमचा व्हिडिओ स्ट्रीमिंग अटकत असेल आणि राउटरचा लाल दिवा चमकत असेल, तर समस्या फक्त तुमच्या डिव्हाइसमध्ये नाही तर राउटर किंवा इंटरनेट कनेक्शनमध्ये आहे. यामुळे वेळेवर उपाय शोधणे सोपे होते.
advertisement
नोट्स
राउटरच्या लाईट्सकडे लक्ष देणे महत्वाचे आहे कारण ते केवळ कनेक्शनची स्थितीच दर्शवत नाहीत तर तुमच्या इंटरनेटची स्थिती देखील दर्शवतात. चांगल्या इंटरनेट स्पीडसाठी राउटर वेळोवेळी रीस्टार्ट करणे आणि त्याचे सिग्नल आणि सेटिंग्ज तपासणे अत्यंत महत्वाचे आहे.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
WiFi राउटरच्या कलरफूल रंगांचा अर्थ काय? 99% लोकांना माहितीच नाही उत्तर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement