Data Dump Technology : काय आहे डेटा डंप टेक्नोलॉजी ज्याचा वापर करुन मुंबई पोलिसांनी Saif Ali Khan च्या हल्लेखोराला पकडलं?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
What is the meaning of data dump : तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की हे डेटा डंप तंत्रज्ञान नक्की आहे तरी काय? ज्याचा वापर करुन पोलिसांनी आरोपीला लगेच पकडलं? चला डेटा डंपबद्दल थोडं सविस्तर माहिती घेऊ.
मुंबई : सध्या बॉलिवूडमधील एक बातमी सर्वांत जास्त चर्चेत आली ती म्हणजे अभिनेता सेफ अली खानवरील हल्ला. खरंतर अभिनेत्यावर त्याच्या घरी एका अज्ञात व्यक्तीकडून चाकूने हल्ला करण्यात आला, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. हा वार इतका डिप होता की सेफच्या मनक्यापर्यंत घाव झाला. सध्या सेफची तब्येतीत थोडी सुधारणा झाली असल्याचं डॉक्टरानी सांगितलं. पण असं असलं तरी हा प्रकार कोणी आणि का केला? याबद्दल सर्वत्र चर्चा सुरु आहे. पोलिसही या प्रकरणाचा तपास घेत आहेत.
सेफच्या बिल्डिंगमधील सीसीटीव्ही फुटेज मिळालं ज्यामध्ये हल्लेखोराची ओळख पटली आणि यानंतर पोलिसांनी डेटा डंप तंत्रज्ञानाचा वापर करून चोराची सर्व माहिती काढली. आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की हे डेटा डंप तंत्रज्ञान नक्की आहे तरी काय? ज्याचा वापर करुन पोलिसांनी आरोपीला लगेच पकडलं? चला डेटा डंपबद्दल थोडं सविस्तर माहिती घेऊ.
advertisement
डेटा डंप म्हणजे काय? (What is the meaning of data dump)
डेटा डंपला मोबाईल फोन डंप (Data Dump) किंवा सेलफोन डंप देखील म्हणतात. हे एक तंत्रज्ञान आहे जे एखाद्या व्यक्तीचा डिजिटल डेटा काढण्यात आणि तपासण्यात मदत करते. यामध्ये इतर माहितीसह कॉल लॉग, मेसेज, ईमेल, फोटो, व्हिडिओ आणि ब्राउझिंग हिस्ट्रीचा देखील समावेश आहे. सामान्यत: या तंत्राचा वापर पोलिस किंवा तपास यंत्रणांकडून गुन्हेगारांना ओळखण्यासाठी आणि तपास प्रक्रियेला गती देण्यासाठी करतात.
advertisement
हे तंत्रज्ञान कसे कार्य करते?
डेटा डंप तंत्राचा मुख्य उद्देश संशयास्पद व्यक्तीचा डिजिटल डेटा काढणे आणि ते काय करण्याचं प्लान करतायत यावर लक्ष ठेवणे किंवा माहिती काढणे. ही प्रक्रिया सुरू होते, जेव्हा एखादी घटना किंवा गुन्हा घडल्यानंतर तपास यंत्रणांना गुन्हेगाराची ओळख किंवा त्याच्या ठिकाणाविषयी माहिती गोळा करावी लागते. या प्रक्रियेअंतर्गत स्मार्टफोन किंवा अन्य उपकरणाशी संबंधित डेटा मिळवला जातो.
advertisement
डेटा डंप करण्याच्या प्रक्रियेत, सर्वप्रथम संशयित व्यक्ती कोणत्या नेटवर्क क्षेत्रात होती हे पाहिले जाते. यासाठी लोकेशन ट्रॅकिंग फीचर आणि सेल टॉवर्सची मदत घेतली जाते. सेल टॉवर्स स्मार्टफोनद्वारे वापरलेला सर्व डेटा संग्रहित करतात, जो दूरसंचार कंपन्या सुरक्षित ठेवतात.
जेव्हा जेव्हा आपण कॉल करतो, संदेश पाठवतो किंवा स्मार्टफोनवरून इंटरनेट ब्राउझ करतो तेव्हा हा डेटा संबंधित सेल टॉवरद्वारे हस्तांतरित केला जातो. हा डेटा टेलिकॉम कंपन्यांकडे रेकॉर्डच्या स्वरूपात संग्रहित केला जातो. डेटा डंप प्रक्रियेत, पोलिस हा डेटा मिळवतात आणि संशयिताची हालचाल आणि स्थान शोधतात.
advertisement
डिजिटल पुरावा व्यवस्थापन प्रणाली (DEMS)
DEMS (डिजिटल एव्हिडन्स मॅनेजमेंट सिस्टम) डेटा डंप प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावते. ही प्रणाली डिजिटल पुरावे हाताळण्यासाठी आणि व्यवस्थापित करण्यासाठी कार्य करते. तथापि, कायदेशीर प्रक्रियेशिवाय हा डेटा कोणालाही उपलब्ध नाही. तपास यंत्रणांना डेटा ऍक्सेस करण्यासाठी कायदेशीर परवानगी घ्यावी लागते.
याचाच वापर पोलिसांनी सैफ अली खानच्या प्रकरणात केला. या तंत्राद्वारे संशयिताचे ठिकाण आणि त्याच्या हालचालींची माहिती संकलित करून त्याची ओळख पटवणे शक्य होते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 17, 2025 8:32 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Data Dump Technology : काय आहे डेटा डंप टेक्नोलॉजी ज्याचा वापर करुन मुंबई पोलिसांनी Saif Ali Khan च्या हल्लेखोराला पकडलं?











