car cover : लाडक्या कारच्या स्टीअरिंग व्हीलला कव्हर लावताय? पण नुकसान काय होईल माहितीये का?
- Published by:sachin Salve
- trending desk
Last Updated:
स्टीअरिंग व्हील हा कारच्या नियंत्रणासाठीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे योग्य ती खबरदारी बाळगूनच कव्हर बसवावं.
मुंबई, 18 सप्टेंबर : कोणीही व्यक्ती जेव्हा नवी कार खरेदी करते, तेव्हा त्यात सीट आणि स्टीअरिंगवर कव्हर लावून घेते. स्टीअरिंग व्हीलवर कव्हर लावल्यामुळे ते लवकर खराब होत नाही. तसंच, जेव्हा कव्हर काढलं जातं, तेव्हा व्हील अगदी नव्यासारखं दिसतं. अनेक जणांचं या बाबतीत कन्फ्युजन असतं, की स्टीअरिंग व्हीलवर कव्हर लावावं की नाही. स्टीअरिंग व्हीलवर कव्हर लावण्याचे नक्कीच काही फायदे आहेत; मात्र त्यामुळे काय नुकसान होऊ शकतं, याचीही माहिती करून घेतली पाहिजे. कारण ही बाब सुरक्षिततेशी निगडित आहे. म्हणूनच स्टीअरिंग व्हीलवर कव्हर लावण्याचे फायदे आणि तोटे जाणून घेऊ या.
फायदे :
- स्टीअरिंग व्हील कव्हर कारच्या इंटीरियरला नवा आणि स्टायलिश लूक देतो. स्टीअरिंग व्हील कव्हर लेदर आणि अन्य अनेक प्रकारात उपलब्ध असतं. त्यामुळे कारला आतून प्रीमिअम लूक मिळतो.
- कव्हरमुळे स्टीअरिंग व्हील सुरक्षित राहतं. त्यावर धूळ आणि घाण जमा होत नाही. कव्हर जुनं झाल्यावर ते सहजपणे बदलता येऊ शकतं.
- स्टीअरिंग व्हीलला कव्हर लावलं नाही, तर ते अनेकांना खूप घट्ट किंवा कडक वाटतं. त्यामुळे सॉफ्ट मटेरियलपासून बनलेल्या कव्हरमुळे हातांना आराम मिळतो.
advertisement
स्टीअरिंग व्हीलचे तोटे :
- कव्हरमुळे स्टीअरिंग व्हीलच्या रिस्पॉन्सवर प्रभाव पडू शकतो. त्यामुळे कार चालवण्यात असहजता जाणवू शकते. त्यामुळे कधी तरी अपघातही होऊ शकतो.
- कव्हरमुळे स्टीअरिंग व्हीलची जाडी वाढते. ज्यांना स्टीअरिंग व्हीलला कव्हर लावून चालवण्याची सवय नाही, त्यांना कव्हर लावून स्टीअरिंग व्हील पकडण्यात अडचण वाटू शकते. त्यामुळे कार चालवण्यात पूर्ण कॉन्फिडन्स वाटत नाही.
advertisement
स्टीअरिंग व्हीलला कव्हर लावायचं असेल, तर नेहमी उत्तम दर्जाचं कव्हरच निवडावं. कव्हरची जाडी जास्त नसेल, याची काळजी घ्यावी. कव्हर कुठूनही सुटणार नाही किंवा सरकणार नाही, याची काळजी घ्यावी. कव्हरचा आकार योग्य असेल, यावर कायम लक्ष ठेवा.
एकंदरीतच, स्टीअरिंग व्हील हा कारच्या नियंत्रणासाठीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे योग्य ती खबरदारी बाळगूनच कव्हर बसवावं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 18, 2023 8:30 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलाॅजी/
car cover : लाडक्या कारच्या स्टीअरिंग व्हीलला कव्हर लावताय? पण नुकसान काय होईल माहितीये का?