advertisement

तुमचं व्हॉट्सअ‍ॅप दुसरं कोणी तर वापरत नाहीये ना? या ट्रिकने लगेच कळेल

Last Updated:

WhatsApp Tips and Tricks: व्हॉट्सॲपमध्ये अशी अनेक फीचर्स आहेत जी खूप उपयुक्त आहेत. अनेक वेळा आपण अशा डिव्हाइसवर WhatsApp चालवतो जिथून आपण नंतर लॉग आउट करणे विसरतो. पाहूया की, तुमचे अकाउंट अजून कुठे चालू आहे? हे कसं शोधायचं.

व्हॉट्सअॅप
व्हॉट्सअॅप
मुंबई : WhatsApp हे एक लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ॲप आहे. जे प्रत्येकजण वापरतो. हे ॲप जगभरात सर्वाधिक पसंत केले जाते. म्हणूनच ॲपवर दररोज लाखो अॅक्टिव्ह यूझर्स आहेत. पण तुमचे व्हॉट्सॲप कुठे चालते हे तुम्हाला माहिती आहे का? ॲपमध्ये यूझर्ससाठी व्हॉट्सॲपची अनेक फायदेशीर फीचर्स प्रदान करण्यात आली आहेत, यापैकी एक फीचर असे आहे की ते तुम्हाला तुमचे व्हॉट्सॲप कुठे चालू आहे याची माहिती देते.
हे WhatsApp Feature कोणते आहे?
या फीचरचे नाव आहे Linked Devices, या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमचे व्हॉट्सॲप कुठे चालू आहे हे शोधू शकता. अनेक वेळा आपण व्हॉट्सॲप वेबवर लॉग इन करतो पण लॉग आउट करायला विसरतो आणि व्हॉट्सॲप लॉग इन राहते. अशावेळी एका ट्रिकने तुमचं व्हॉट्सअॅप कुठे कुठे चालू राहिलंय हे तुम्ही पाहू शकता. म्हणजेच तुमची प्रायव्हसी कायम राहील.
advertisement
WhatsApp Linked Device
सर्वप्रथम, व्हॉट्स ॲप उघडा, ॲप उघडल्यानंतर उजव्या बाजूला दिसणाऱ्या तीन डॉट आयकॉनवर क्लिक करा. थ्री डॉटवर टॅप केल्यानंतर, तुम्हाला लिंक केलेल्या डिव्हाइस ऑप्शनवर टॅप करावे लागेल. लिंक केलेल्या डिव्हाइसवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं व्हॉट्सॲप ज्या ज्या डिव्हाइसवर चालू आहे त्याची यादी दिसेल.
advertisement
तुम्हाला या लिस्टमध्ये कोणतेही डिव्हाइस आढळले जेथे तुम्ही अकाउंट तयार केलेले नाही, तर तुम्ही या लिस्टमधील त्या डिव्हाइसच्या नावावर क्लिक करून तेथून अकाउंट लॉग आउट देखील करू शकता. व्हॉट्सॲपचे हे फीचर खूप उपयुक्त आहे. कारण जर चुकूनही तुमचं व्हॉट्सॲप दुसऱ्या डिव्हाइसवर लॉग इन राहीलं तर तुम्ही तुमच्या प्रायमरी डिव्हाइसच्या मदतीने इतर डिव्हाइसवरून अकाउंट सहजपणे हटवू शकता.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
तुमचं व्हॉट्सअ‍ॅप दुसरं कोणी तर वापरत नाहीये ना? या ट्रिकने लगेच कळेल
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement