advertisement

बाईक बंद केल्यावर का येतो 'टक-टक' आवाज? शक्यतो लाँग ड्राइव्हनंतर येतो असा आवाज, पण का?

Last Updated:

या संबंधीत प्रश्न जेव्हा सोशल मीडिया साईट कोरावर विचारला गेला. तेव्हा तिथे अनेकांनी वेगवेगळी उत्तर दिली आहेत.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई, 30 नोव्हेंबर : आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी घडत असतात ज्याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. कधी कधी समोर गोष्ट दिसली तरी जाऊ देत ना असं म्हणत आपण त्याकडे काना डोळा करतो. तर काहींची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला तरी देखील त्याचं उत्तर आपल्याला सापडत नाही.
त्यापैकी एक आहे बाईकमधून येणारा आवाज. बऱ्याचदा तुम्ही पाहिलं किंवा ऐकलं असेल की बाईक बंद केली तरी देखील त्यामधून टक टक आवाज येत असतो. पण तो आवाज का येत असतो? याचं कारण अनेकांना ठावूक नसतं. काही लोक याबद्दल मॅकेनिकला देखील विचारतात. पण मॅकेनीक देखील बऱ्याचदा असा आवाज बाईक मधून येत असतो असं, ते कॉमन आहे असं उत्तर देतात. ज्यामुळे अनेकांना याचं कारण ठावूक नसतं.
advertisement
या संबंधीत प्रश्न जेव्हा सोशल मीडिया साईट कोरावर विचारला गेला. तेव्हा तिथे अनेकांनी वेगवेगळी उत्तर दिली आहेत. ज्यावर एक नजर टाकू. न्यूज 18 मराठी या उत्तराची पुष्टी करत नाही. पण एक माहितीचा भाग म्हणून त्यावर एक नजर टाकू.
Quora वर मनोज पाटील नावाच्या व्यक्तीने सांगितले- "बाईकच्या एक्झॉस्टमध्ये हानिकारक पदार्थ असतात, त्यातील एक कार्बन मोनोऑक्साइड आहे. यासह त्यात हायड्रोकार्बन्स आणि नायट्रोजन ऑक्साईड देखील असतात, जरी ते प्रदूषण किंवा आम्ल वर्षाला कारणीभूत ठरते. या कारणास्तव, बाइकच्या सायलेंसरमध्ये एक उत्प्रेरक कनवर्टर स्थापित केला जातो. हा कन्व्हर्टर या हानिकारक पदार्थांवर प्रतिक्रिया देतो आणि कार्बन मोनोऑक्साइडचे कार्बन डायऑक्साइडमध्ये रूपांतर करतो."
advertisement
पुढे ते म्हणाले, "अशा परिस्थितीत, जेव्हा तुम्ही बाईक चालवता, जेव्हा सायलेन्सर गरम होतो, तेव्हा कन्व्हर्टरच्या आतील पाईप देखील गरम होतात आणि ते विस्तृत होतात. यानंतर बराच वेळ बाईक चालवल्यानंतर बाईक बंद केल्यावर हा पाइपही थंड होतो आणि हळूहळू आकुंचन पावू लागतो. वेगवेगळे थर वेगवेगळ्या दरांवर थंड होत असल्याने, बोल्टच्या क्लॅम्पिंग लोडची पर्वा न करता ते एकमेकांवर घासतात. जेव्हा इंजिन चालू असते आणि उत्प्रेरक कनव्हर्टर उच्च तापमानात त्यातून बाहेर पडणाऱ्या वायूंच्या अधीन असतो, तेव्हा ते विस्तारते आणि तुम्ही इंजिन बंद करेपर्यंत तुम्हाला इंजिन थंड होण्याची संधी नसते. या प्रक्रियेमुळे टिकिंगचा आवाज येतो. अशा परिस्थितीत ही एक सामान्य प्रक्रिया आहे आणि त्याबद्दल घाबरण्याची गरज नाही. ”
advertisement
शिवम विद्रोही नावाच्या व्यक्तीने सांगितले की, "दूरवरून आल्यावर, बाईक बंद केल्यानंतर अनेकदा किट-किट, टिक-टिक किंवा टक-टक असा आवाज येतो. जुन्या वाहनांमध्ये हा आवाज तुम्हाला आढळणार नाही. हा आवाज BS4 आणि BS6 बाईकमधून येतो कारण त्यांच्याजवळ सायलेन्सरजवळ एक उत्प्रेरक कन्व्हर्टर बसवलेले असते जे घातक वायू सोडण्यापासून रोखते.
उत्प्रेरक कनव्हर्टरच्या आत जाळीसारखा एक अतिशय लहान भाग आहे, त्यावर मौल्यवान धातूचा थर आहे आणि सायलेन्सरच्या आत एक पातळ पाईप आहे ज्यामुळे आवाज कमी होतो, जो बाईक चालवताना गरम होतो आणि आपण चालवतो तेव्हा वाढतो. त्यानंतर तुम्ही गबाईक बंद केल्यावर ती लहान होऊ लागते ज्यामुळे असा आवाज येतो."
advertisement
सोशल मीडियावर लोकांनी दिलेल्या उत्तरांशी प्रत्येकजण सहमत देखील आहे.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलाॅजी/
बाईक बंद केल्यावर का येतो 'टक-टक' आवाज? शक्यतो लाँग ड्राइव्हनंतर येतो असा आवाज, पण का?
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement