अचानक का बदलली फोनची कॉलिंग स्क्रीन? तुम्हाला नको असेल तर फोनमध्ये लगेच करा ही सेटिंग

Last Updated:

अनेकांना तर माझा फोन बददला वाटतं असा देखील प्रश्न पडू लागले. तर अनेकांना आता आपल्याला आलेला फोन कसा उचलायचा असा देखील प्रश्न पडला आहे.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : अनेक फोन युजर्सचे अलीकडे फोन ऍपमधील कॉल सेटिंग्ज आपोआप बदलल्या आहेत. हे का घडलं? कशामुळे घडलं? माझ्या फोनला हे अचानक काय झालं? (phone dialer screen change) असे अनेक प्रश्न लोकांना पडू लागले. अनेकांना तर माझा फोन बददला वाटतं असा देखील प्रश्न पडू लागले. तर अनेकांना आता आपल्याला आलेला फोन कसा उचलायचा असा देखील प्रश्न पडला आहे. (why my phone dialer screen change)
पण खरंतर गुगलने आपल्या Phone by Google या ऍपचा नवा डिझाइन अपडेट (Google Phone App) केलं आहे. या अपडेटमध्ये कॉल हाताळताना होणाऱ्या चुका टाळण्यासाठी नवे फीचर्स, सोपं इंटरफेस आणि आकर्षक डिझाइन दिलं आहे.
पण अनेकांना हे इंटरफेस किंवा नवीन अपडेट वापरायला किचकट असल्याचं वाटत आहेत (Dialer Screen Change Reason). ज्यामुळे त्यांना आपल्या फोनची जुनी सेटिंग परत हवी आहे. अशा लोकांसाठी ही सेटिंग कशी पुन्हा मिळवता येईल यासाठी स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे. जी फॉलो करुन तुम्ही तुमचा फोन पहिल्यासारखा करु शकता.
advertisement
आधी फोनमध्ये काय बदल आहेत हे पाहू, मग त्यांना कसं बदलायचं किंवा पहिल्या सारखं करायचं हे देखील समजून घेऊ
टॅब लेआउट
आधीचे Favorites, Recents, Contacts आणि Voicemail असे वेगळे टॅब काढून टाकून आता फक्त तीन टॅब ठेवले आहेत जे Home, Keypad आणि Voicemail आहेत.
होम टॅब
वरती आवडते (Favorites) कॉन्टॅक्ट्सचा कॅरोसेल आणि त्याखाली सर्व कॉल्सची यादी. आता प्रत्येक कॉल स्वतंत्रपणे दिसेल. आधीप्रमाणे एका व्यक्तीचे कॉल्स एकत्र दिसणार नाहीत.
advertisement
इनकमिंग कॉल इंटरफेस
कॉल स्वीकारण्यासाठी (Accept) किंवा नाकारण्यासाठी (Decline) आता दोन पर्याय दिले आहेत:
आडवा स्वाइप (Horizontal Swipe) – उजवीकडे बटण ओढलं की फोन स्विकारला जाणार, तर डावीकडे ओढलं की नाकारला जाणार किंवा कट होणार
सुरुवातील फोनमध्ये सिंगल-टॅप बटण होतं, यामुळे थेट एका बटणावर टॅप करून फोन कट केला जायचा किंवा उचलला जायचा. पण आता या नवीन फीचरमुळे फोन खिशातून काढताना चुकीने कॉल लागणे किंवा कट होणे कमी होईल.
advertisement
गुगलने आपल्या नवीन Material 3 Expressive डिझाइन भाषा वापरली आहे. यात रंगीत, गोलसर फ्रेम्स, अॅनिमेशन, पिल-आकाराची बटन्स यांचा समावेश आहे.
प्रत्येक कॉल वेगळा दाखवल्यामुळे मिस्ड कॉल्स किंवा रिपीटेड कॉल्स पटकन लक्षात येतात.
हे बदल Phone by Google अॅपच्या 186+ आवृत्तीत दिसू लागले आहेत. पण काहींना हे बदल दिसलेले नाहीत त्यांच्या फोनमध्ये पुढच्या आठवड्यात हे बदल दिसतील. बीटा टेस्टर्स (विशेषतः Android 16 वापरणारे) यांना हे आधी मिळाले आहेत.
advertisement
जुनं इंटरफेस किंवा सेटिंग्स परत आणण्यासाठी फॉलो करा स्टेप बाय स्टेप प्रोसेस (how to change phone dialer on android)
-Play Store उघडा
-"Phone by Google" शोधा
-अॅपमध्ये जाऊन Uninstall Update निवडा
-मग जुना इंटरफेस परत दिसेल
गुगलचा हा अपडेट वापरकर्ता अनुभव सुधारण्यासाठी आणि चुकून कॉल लागणे थांबवण्यासाठी केला आहे. यात एकीकडे आधुनिक डिझाइन आणि सोपं इंटरफेस आहे, तर दुसरीकडे वापरकर्त्यांच्या सवयी मोडल्याने थोडा गोंधळ निर्माण झालाय.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
अचानक का बदलली फोनची कॉलिंग स्क्रीन? तुम्हाला नको असेल तर फोनमध्ये लगेच करा ही सेटिंग
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement