BlinkIt वरुन 10 मिनिटांत बोलवू शकाल रुग्णवाहिका, 'या' शहरात सर्व्हिस सुरु
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
ब्लिंकिटने रुग्णवाहिका सेवा सुरू केली आहे. ब्लिंकिटची ही रुग्णवाहिका सेवा अवघ्या 10 मिनिटांत रुग्णांपर्यंत पोहोचण्याचे आश्वासन देते. ब्लिंकिटचे सीईओ अलबिंदर धिंडसा यांनी स्वतः लिंक्डइनवर ही माहिती दिली आहे.
मुंबई : भारतात क्विक कॉमर्सला गती मिळाली आहे. पारंपारिक ई-कॉमर्सला मागे सोडले आहे. आत्तापर्यंत BlinkIt फक्त किराणा, इलेक्ट्रॉनिक्स इत्यादी प्रोडक्ट डिलिव्हर करते. मात्र आता ब्लिंकइटने रुग्णवाहिका सेवा सुरू केली आहे. BlinkIt ची ही रुग्णवाहिका सेवा केवळ 10 मिनिटांत रुग्णांपर्यंत पोहोचण्याचे आश्वासन देते. त्याची पहिली सेवा गुरुग्राममध्ये देण्यात आली आहे.
अवघ्या 10 मिनिटात रुग्णवाहिका सर्व्हिस
BlinkIt ने गुरुग्राममध्ये अवघ्या 10 मिनिटांत रुग्णवाहिका सर्व्हिस उपलब्ध करून दिली. BlinkIt चे CEO अलबिंदर धिंडसा यांनी स्वतः LinkedIn वर ही माहिती दिली आहे. गुरुग्रामच्या रस्त्यांवर सुरुवातीला पाच रुग्णवाहिका तैनात करण्यात येणार आहेत. ही सेवा इतर शहरांमध्येही विस्तारण्याची योजना आहे. ही सेवा BlinkIt ॲपद्वारे वापरली जाऊ शकते. यूझर्स फक्त एका क्लिकवर परवडणाऱ्या दरात रुग्णवाहिका बुक करू शकतात.
advertisement
BlinkIt चे CEO काय म्हणाले?
अल्बिंदर धिंडसा यांनी त्यांच्या लिंक्डइन पोस्टमध्ये लिहिले की, 'आम्ही आमच्या शहरांमध्ये फास्ट रुग्णवाहिका सेवा देण्यासाठी काम करत आहोत. अशा परिस्थितीत आम्ही या दिशेने पहिले पाऊल टाकत आहोत. गुरुग्राममध्ये आजपासून पहिल्या पाच रुग्णवाहिका रस्त्यावर येणार आहेत. ही सेवा अधिक शहरांमध्ये विस्तारली जाईल. तुम्हाला BlinkIt ॲपद्वारे बेसिक लाइफ सपोर्ट (BLS) रुग्णवाहिका बुक करण्याचा ऑप्शन दिसेल.
advertisement
या फॅसिलिटीची काळजी घेण्यात आली आहे
प्रत्येक रुग्णवाहिका ऑक्सिजन सिलेंडर, ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर (AED), स्ट्रेचर, मॉनिटर, सक्शन मशीन आणि आपत्कालीन औषधे आणि इंजेक्शन्ससह आवश्यक वस्तूंनी सुसज्ज असेल. याशिवाय रुग्णवाहिकेत एक पॅरामेडिक आणि एक चालक उपस्थित राहणार आहे. लोकांना आपत्कालीन स्थितीत थांबावे लागणार नाही, हा त्यांचा उद्देश असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 03, 2025 11:36 AM IST