advertisement

Titwala: त्याने वेगाने रस्ता ओलांडला अन् मागे 3 सेकंदात वैभवचा जीव गेला, विचित्र अपघाताचा LIVE VIDEO

Last Updated:

नियंत्रण सुटल्यामुळे दुसऱ्या दुचाकीस्वार एका डंपरच्या चाकाखाली सापडला. या दुर्दैवी घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

News18
News18
टिटवाळा : टिटवाळ्यामध्ये मागील आठवड्यामध्ये रेल्वे स्टेशन परिसरात एक भरधाव कंटेनर शिरलं आणि १० ते १५ वाहनांना चिरडलं होतं. अशात कल्याण-नगर मार्गावर एक भयानक घटना समोर आली आहे. रस्ता ओलांडत असताना दुचाकीचा धक्का लागणार असं वाटत असतााना नियंत्रण सुटल्यामुळे दुसऱ्या दुचाकीस्वार एका डंपरच्या चाकाखाली सापडला. या दुर्दैवी घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण-नगर मार्गावर २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.५१ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. वैभव साहेबाराव भामरे (वय २४) असं मृत दुचाकीस्वाराचं नाव आहे. वैभव भामरे हे नाशिक इथं राहणारे होते. कामाच्या निमित्ताने ते टिटवाळ्यात आले होते.
टिटवाळ्यातील कल्याण-अहिल्यानगर मार्गावरून जात होते. त्याचवेळी रस्त्यावर एका ठिकाणी रस्ताा ओलांडून एक दुचाकीस्वार आला. तर दुसरीकडे मुख्य मार्गावर वैभव भामरे हे डंपरच्या बाजूने येत होते. अचानक दुचाकीस्वाराने रस्ता ओलांडून वेगाने निघून गेला.
advertisement
[video width="1600" height="900" mp4="https://images.news18.com/news18marathi/uploads/2026/02/titwala-1-2026-02-af4b9a82b0cdcf75d0099467be98a91d.mp4"][/video]
दुचाकीस्वाराला धडकणार अशी शक्यता वाटल्यामुळे वैभव भामरे यांनी आपली दुचाकीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. पण, याावेळी त्यांचा तोल गेला आणि ते खाली पडले. त्याचवेळी मागून आलेला भरधाव डंपरच्या चाकाखाली वैभव भामरे सापडले. अवघ्या ५ सेकंदाच्या घडलेल्या याा घटनेत वैभव भामरे यांचा जागेवरच मृत्यू झाला.  भामरे खाली पडल्याचं पाहून समोरून गेलेल्या दुचाकीस्वाराने लगेच गााडी उभी करून धाव घेतली. स्थानिकांनी वैभव भामरे यांच्याकडे धाव घेतली. मात्र, डंपरची समोरील आणि मागील चाकं ही भामरे यांच्या अंगावरून गेली, त्यामुळे भामरे यांचा जागेवरच मृत्यू झाला.
advertisement
अंगावर शहारे आणणारी ही घटना कल्याण-अहिल्यानगर मार्गावर असलेल्या एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
Titwala: त्याने वेगाने रस्ता ओलांडला अन् मागे 3 सेकंदात वैभवचा जीव गेला, विचित्र अपघाताचा LIVE VIDEO
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement