Shocking News : पार्सल घेण्यासाठी आला अन् क्षणातच चित्र बदललं; नालासोपारातील धक्कादायक घटना
Last Updated:
Nalasopara Crime News : विरार पूर्वेकडील कोपरी भागात ऑनलाईन पार्सल देण्यासाठी आलेल्या कुरिअर बॉयने जुन्या वादातून ग्राहकावर लाकडी दांडक्याने हल्ला केला. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नालासोपारा : नालासोपारा परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली असून ऑनलाईन मागवलेले पार्सल देण्यासाठी आलेल्या कुरिअर बॉयनेच ग्राहकावर जीवघेणा हल्ला केल्याचे उघड झाले आहे. विरार पूर्वेकडील कोपरी भागात ही घटना घडली असून जुन्या वादाचा राग मनात धरून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
पार्सल देण्यासाठी आलेल्या व्यक्तीने ओलांडली हद्द
तक्रारदार शिवप्रकाश जांगिड यांनी दिल्लीहून ऑनलाईन मोबाईल चार्जर मागवला होता. 12 जानेवारी रोजी दुपारी DTDC कुरिअर कंपनीचे दोन कर्मचारी पार्सल देण्यासाठी आले होते. मात्र तक्रारदार सध्या त्या जुन्या पत्त्यावर राहत नसल्याने त्यांनी कुरिअर बॉयला प्रत्यक्ष भेटण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी बोलावले.
भेट झाल्यानंतर आरोपींनी जुन्या वादाचा मुद्दा काढत वाद सुरू केला. ''तू आमचा व्हिडिओ काढून ऑफिसमध्ये पाठवला होतास,'' असा आरोप करत कुरिअर बॉयने शिवप्रकाश यांच्याशी हुज्जत घातली. काही वेळातच हा वाद हाताबाहेर गेला. या दरम्यान एका आरोपीने शिवप्रकाश यांना पकडून ठेवले तर दुसऱ्या आरोपीने त्यांच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात शिवप्रकाश गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
advertisement
या प्रकरणी विरार पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यात येत असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 14, 2026 11:44 AM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Shocking News : पार्सल घेण्यासाठी आला अन् क्षणातच चित्र बदललं; नालासोपारातील धक्कादायक घटना








