Navi Mumbai Airport: अखेर प्रतिक्षा संपली! नवी मुंबईतून पहिलं टेकऑफ, ‘या’ 5 शहरांसाठी विमानसेवा सुरू
- Reported by:
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Navi Mumbai Airport: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील ग्रीनफिल्ड विमानतळ आहे. पहिल्याच दिवशी सुमारे चार हजार प्रवासी या विमानतळावरून प्रवास करतील.
नवी मुंबई: नवी मुंबई विमानतळाचे अडीच महिन्यांपूर्वी उद्घाटन झाल्यानंतर या विमानतळावरून प्रत्यक्षात प्रवास करण्याची प्रतीक्षा आज संपली आहे. या विमानतळावर इंडिगोचे बंगळुरूहून येणारे पहिले विमान सकाळी 8 वाजता उतरले. त्यानंतर इंडिगोचे विमान 8.40 वाजता हैदराबादकडे झेपावले. अकासा एअर, एअर इंडिया एक्स्प्रेस, स्टार एअर यांची विमानेही आज सेवेत असणार आहेत.
पहिल्याच दिवशी सुमारे चार हजार प्रवासी या विमानतळावरून प्रवास करतील. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील ग्रीनफिल्ड विमानतळ आहे. या विमानतळावरील पहिला प्रवास सर्व प्रवाशांच्या लक्षात राहावा, त्यामुळे प्रवाशांच्या स्वागतासाठी विमानतळ व्यवस्थापकांकडून विविध पाच ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने विशेष योजना आखण्यात आल्या आहेत.
advertisement
प्रवासादरम्यान विमानतळावर आणि विमानातही प्रवाशांना भेटवस्तू, बक्षिसे दिली जाणार आहेत. आज नवी मुंबई ते गोवा, कोची, बेंगळुरू आणि हैदराबाद अशी विमानसेवा असणार असून, विमानतळ व्यवस्थापनाबरोबरच काही विमान कंपन्यांकडूनही प्रवाशांच्या स्वागतासाठी विशेष योजना आखण्यात आली आहे. त्यामुळे हा प्रवास प्रवाशांसाठी सुखद धक्का देणारा ठरेल, असा विश्वास अदानी विमानतळ समूहाचे संचालक जीत अदानी यांनी व्यक्त केला.
advertisement
दरम्यान, नवी मुंबईतून विमानतळाकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांची डागडुजी, साफसफाई करण्यात आली आहे. विमानतळ परिसरातही चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आल्याचे चित्र दिसत आहे. कमळाच्या आकाराचे हे आकर्षक विमानतळ असून, विमानतळाच्या आतील रचनाही अत्याधुनिक पद्धतीने करण्यात आली आहे. इथे महाराष्ट्राची सांस्कृतिक प्रतिमाही पाहायला मिळणार आहे, असे व्यवस्थापकांनी सांगितले.
कुठे उड्डाणे सुरू होणार?
1. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा नवी मुंबई, पनवेल व उरण या परिसराला फायदा होणार असून विमानतळामुळे या भागाच्या विकासाला अजून गती मिळणार आहे.
advertisement
2. नवी मुंबई विमानतळावरून प्रवाशांसाठी बंगळूरु, हैदराबाद, गोवा, कोची आणि अहमदाबादसाठी उड्डाणे सुरू होतील. आकाशा एअर, इंडिगो एअरलाईन्स, एअर इंडिया एक्सप्रेस आणि स्टार एअर या कंपन्या सेवा देणार आहेत.
view commentsLocation :
Navi Mumbai,Thane,Maharashtra
First Published :
Dec 25, 2025 11:27 AM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Navi Mumbai Airport: अखेर प्रतिक्षा संपली! नवी मुंबईतून पहिलं टेकऑफ, ‘या’ 5 शहरांसाठी विमानसेवा सुरू










