Crime : हप्ते थकले; खिशात पैसा नाही;दुचाकीचे कर्ज फेडण्यासाठी तरुणाने केलेल्या 'त्या' कृत्याची शहरभर चर्चा
Last Updated:
Boisar Gold Theft Attempt : बोईसरमध्ये दुचाकी कर्जाचे हप्ते थकल्याने हताश झालेल्या व्यक्तीने सराफा दुकानातून सोनसाखळी चोरण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी सतर्कता दाखवत त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
ठाणे : बोईसरमध्ये आर्थिक अडचणीमुळे घडलेली एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नव्याने खरेदी केलेल्या दुचाकीच्या कर्जाचे हप्ते थकवल्याने हताश झालेल्या एका व्यक्तीने सोनाऱ्याच्या दुकानातून सोन्याचे दागिने चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र,नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा चोरीचा डाव फसला गेला.
हौस महागात पडली
रविवारी सायंकाळच्या सुमारास बोईसरमधील ओसवाल एम्पायर परिसरातील एका सराफा दुकानात एक व्यक्ती ग्राहक असल्याचे भासवत दाखल झाला. सोनसाखळी खरेदी करण्याच्या बहाण्याने त्याने दुकानदाराशी संवाद साधला. दुकानदार दागिने दाखवत असतानाच संधी साधत आरोपीने एक सोनसाखळी उचलली आणि लगेत दुकानाबाहेर पळ काढला.
दागिने चोरीस गेल्याचे लक्षात येताच दुकानदाराने जोरजोरात आरडाओरड केली. आवाज ऐकताच आसपासच्या नागरिकांनी तत्काळ पाठलाग सुरू केला. काही अंतरावर असलेल्या सर्कस मैदानाजवळ नागरिकांनी चोराला पकडले. त्यानंतर संतप्त नागरिकांनी त्याला चोप देत बोईसर पोलिसांच्या ताब्यात दिले.
advertisement
पोलिसांनी चौकशी केली असता आरोपीने धक्कादायक माहिती दिली. काही दिवसांपूर्वी त्याने कर्ज घेऊन दुचाकी खरेदी केली होती. मात्र कायमस्वरूपी नोकरी नसल्याने तीन ते चार महिन्यांचे कर्जहप्ते थकले होते. आर्थिक ताण वाढल्याने आणि कर्ज फेडण्यासाठी पैशांची गरज भासल्याने त्याने चोरीचा मार्ग निवडल्याची कबुली दिली.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 06, 2026 11:16 AM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Crime : हप्ते थकले; खिशात पैसा नाही;दुचाकीचे कर्ज फेडण्यासाठी तरुणाने केलेल्या 'त्या' कृत्याची शहरभर चर्चा









