Shocking : संसाराला सुरुवात केली अन् काही दिवसांत पतीची सटकली; पत्नीला घरातच...; भिवंडीतील धक्कादायक प्रकार
Last Updated:
Padgha News :जिथे संसाराला सुरुवात केल्याच्या काही महिन्यांत पतीने पत्नीची हत्या केलेली आहे. मात्र कारण जे समारे आले आहे त्यामुळे भिवंडी हादरुन गेले आहे.
ठाणे : एकमेकांच्या सुख-दुःखात साथ देत आयुष्य घालवावे अशी प्रत्येक जोडप्याची इच्छा असते. संसार करत असताना पती-पत्नीमध्ये वाद होणेही सामान्य गोष्ट आहे आणि अनेकदा हे वाद शांततेने मिटतात. मात्र भिवंडीत एका पतीने पत्नीशी झालेल्या वादातून संतापाच्या भरात मर्यादा ओलांडत धक्कादायक कृत्य केले.
संसार सुरू होताच संपला
advertisement
भिवंडी तालुक्यातील पडघा परिसरात पतीनेच आपल्या पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. घरगुती कारणावरुन झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन हे टोकाचे पाऊल पतीने उचलल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे.
नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मृत पहिलेचे नाव निर्मला वाघे(वय27) असे असून ती भिवंडीतील कासपाडा या परिसरात तिच्या पतीसोबत राहत होती. गेल्या काही दिवसांपूर्वी निर्मला आणि तिच्या पतीमध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाले होते. याच भांडणाचा राग पतीच्या मनात होता शेवटी त्याने याच रागातून पत्नीवर हल्ला करत तिची हत्या केली.
advertisement
घटनेची माहिती मिळताच पडघा पोलिस तातडीने घटनास्थळी गेली. नंतर आरोपी पती गोरखनाथ वाघे(वय24)याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या गोरखनाथची चौकशी सुरु असून या हत्येमागील नेमके कारण काय होते या सर्व गोष्टींचा तपास पोलिस करत आहेत.
परिसरात घडलेल्या या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र घरगुती वादातून इतक्या टोकाचा निर्णय घेतल्याने परिसरात संशय निर्माण झालेला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 29, 2026 8:40 AM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Shocking : संसाराला सुरुवात केली अन् काही दिवसांत पतीची सटकली; पत्नीला घरातच...; भिवंडीतील धक्कादायक प्रकार








