मेहंदीतून नशिब उजळलं! 23 व्या वर्षी मानसी करते लाखोंची कमाई

Last Updated:

मुलींमध्ये लहानपणापासूनच कलेची देणगी असते परंतु या कलेचा कुठेही प्रदर्शन करून होत नाही. BAF मध्ये शिक्षण पूर्ण करत असलेल्या या विद्यार्थिनीने शाळा ते कॉलेजपर्यंत आपल्या कलेतून खूप प्राईज मिळवले.

+
News18

News18

ज्वेलरी, मेहंदी, स्टोरी टेलिंग असे नाविन्यपूर्ण प्रकार प्रसिद्ध पावत असल्याने मेहंदी व्यवसायाची रंगत आणि उलाढाल वाढली आहे. भारतीय, फ्लोरल, दुबई, अरेबिक, गल्फ या मेहंदीच्या प्रचलित स्टाईल बरोबरच नवे ट्रेंड येत आहेत. मेहंदी आता पूर्वेकडीलच नाही तर पाश्चिमात्य देशातही लोकप्रिय होऊ लागली आहे. त्यामुळेच मेहंदी ही कला आता करियर म्हणून मान्यता पावताना दिसत आहे.
मुलींमध्ये लहानपणापासूनच कलेची देणगी असते परंतु या कलेचा कुठेही प्रदर्शन करून होत नाही. BAF मध्ये शिक्षण पूर्ण करत असलेल्या या विद्यार्थिनीने शाळा ते कॉलेजपर्यंत आपल्या कलेतून खूप प्राईज मिळवले. परंतु हिच कला योग्य ठिकाणी वापरली आणि आज अवघ्या 23 वर्षात स्वतःच्या पायावर उभी राहिली. कुठेही कोर्स केला नसताना आपल्या कलेतून तिने स्वतःची ओळख निर्माण केलेली, ग्रामीण भागात राहत असल्याने तिच्या या कलेला जास्त प्रोत्साहन देणारे कोणी नव्हते.
advertisement
म्हणून तिने तिच्या मैत्रिणीकडे विषय घेऊन एक प्रोफेशन मेहंदी आर्टिस्ट जॉइन करण्याचा निर्णय घेतला आणि प्रोफेशन मेहंदी आर्टिस्ट बनली. मानसीने 2023 साली क्लासेस घेण्याचे ठरवले आणि 8 मुलींपासून क्लास सुरू केला या दोन वर्षात तिच्या 3 बॅच टिटवाळा, गोवेली आणि कल्याण या ठिकाणी सुरू केल्या. त्यातच ती स्वतः मेहंदी कोन बनवण्यापासून सर्वच हँडल करते. कमी वयात गाठलेल शिखर आज तीच भविष्य उजळवून गेलं. ज्या वयात मुलं- मुली करिअरपासून भरकटतात त्याच वयात मानसीने छोट्या व्यवसायाची सुरुवात केली.
advertisement
आज क्लासेस तसेच मेहंदी ऑर्डर आणि मेहंदी कोन बनवण्यातून लाखो रूपये कमावते. म्हणून मानसीने सांगितलं व्यवसाय छोटा मोठा नसतो टपरी टाकून पण लाख रुपये कमवू शकता. आणि मोठ मोठे शॉप टाकून पण 10 हजार कमवू शकता. त्यामुळे योग्य वेळीच आपल्या कलागुणांना वाव द्या आणि स्वतःच्या व्यवसायातच स्वतः मालक बना. मग त्यातून मिळणारा नफा आणि समाधान हे नक्कीच अनुभवाला मिळतो. आज ग्रामीण भागात राहणारी मानसी मुंबई सारख्या शहरात जाऊन ऑर्डर हॅण्डल करते. मानसीच्या या  कलेतून अनेकांचं मन जिंकले आहे.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
मेहंदीतून नशिब उजळलं! 23 व्या वर्षी मानसी करते लाखोंची कमाई
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement