मुलाच्या वाढदिवसाचे आमंत्रण दिले…पण नातेवाईक आले अंत्यसंस्काराला; सेलिब्रेशनच्या आधीच वडिलांचे निधन
- Published by:Prachi Amale
Last Updated:
डॉ.जयदिप यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची बातमी पसरताच सगळ्यांना धक्काच बसला आहे.
नरेश पाटील, प्रतिनिधी
भिवंडी : रुग्णसेवेतून रुग्णांना जीवनदान देणाऱ्या 35 वर्षीय डॉक्टरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची हृदय हेलवणारी दुर्दैवी घटना भिवंडी तालुक्यातील देवरुंग बापगाव येथे घडली आहे. मूळचे कोन गावचे रहिवाशी असणारे पाटील कुटुंबीय देवरुंग बापगाव येथील वृंदावन सोसायटीत राहणाऱ्या स्री रोग तज्ञ आणि प्रसूती तज्ञ डॉ.जयदिप यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची बातमी पसरताच सगळ्यांना धक्काच बसला आहे.
advertisement
विशेष म्हणजे डॉ. दाम्पत्यानी आपल्या 6 वर्षीय मुलाच्या वाढदिवसाची जय्यत तयारी सुरू केली होती .उद्या मुलाचा वाढदिवस असल्याने ड्रॉक्टर दांपत्यांसह पाटील कुटुंबीय आनंदात होते. वाढदिवसाच्या तयारी सोबत डॉ. जयदिप स्वतः मुलाच्या वाढदिवसाचे आमंत्रण फोन करून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून नातेवाईकांना काही तास आधी आग्रहाने आमंत्रित करत होते. मात्र काही वेळाने त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि डॉ. जयदिपचा हृदयविकाराच्या झटक्याने प्राणज्योत मालवल्याची बातमी समोर आली आहे.
advertisement
हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
नातेवाईक मित्र मंडळींना डॉ. जयदिपच्या मुलाच्या वाढदिवसाच्या सोहळ्यात जाण्याऐवजी ज्या बापानी मुलाच्या वाढदिवसाचे आग्रहाचे आमंत्रण दिले होते त्यांना मुलाच्या वाढदिवसा ऐवजी बापाच्या अंत्यविधी सोहळ्याला उपस्थित राहावे लागले. चिमुकला आयुर्वेदच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी पितृ छत्र हरवल्याने मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. एका डॉक्टरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याच्या घटनेने भिवंडी कल्याण तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे.
advertisement
चिमुरड्याचा बापासाठीचा आक्रोश
शवविच्छेदनानंतर डॉ. जयदिप यांच्यावर कोन गावातील वैकुंठ धाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळीच 6 वर्षीय चिमुरड्याचा बापासाठीचा आक्रोश मात्र शोकाकूल उपस्थितांचे हृदय हेलावत होता
view commentsLocation :
Thane,Maharashtra
First Published :
December 07, 2025 9:25 PM IST
मराठी बातम्या/ठाणे/
मुलाच्या वाढदिवसाचे आमंत्रण दिले…पण नातेवाईक आले अंत्यसंस्काराला; सेलिब्रेशनच्या आधीच वडिलांचे निधन


