advertisement

Konkan Railway : कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर; होळीसाठी धावणार विशेष मेमू रेल्वे; जाणून घ्या टाईमटेबल

Last Updated:

Special MEMU Train : शिमग्याला मुंबईतून कोकणात जायत आहे आणि एक्सप्रेस गाड्यांचे तिकीट मिळाले नाही तर काळजी नको, दिव्यातून चिपळूनला जाण्यासाठी मेमू ट्रेन धावणार आहे. मात्र याचे वेळापत्रक कसे असेल ते जाणून घ्या.

Diva to Chiplun special MEMU train March 2026 schedule
Diva to Chiplun special MEMU train March 2026 schedule
दिवा : अवघ्या काही दिवसांवर शिमगा हा सण आलेला आहे. मुंबई आणि दिवा या शहरातून कोकणात जाणाऱ्या नागरिकांची संख्या या कालावधीत मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्याचमुळे ही वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने दिवा ते चिपळूण दरम्यान विशेष अनारक्षित मेमू ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
जाणून घ्या गाडीचे संपूर्ण वेळापत्रक
शिमगा हा सण कोकणातील अतिशय महत्त्वाचा सण आहे. या सणाकरीता प्रत्येक कोकणकर गावी हमखास जात असतो. त्यामुळे कोकण मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी किंवा रेल्वेवर प्रचंड ताण येतो. त्या सर्व दिव्यातून आता चिपळूनला जाता येणार आहे. त्यामुळे ही मेमू विशेष गाडी 1 मार्च 2026 ते 8 मार्च 2026 या कालावधीत दररोज दोन्ही दिशांनी धावणार आहे.
advertisement
गाडी क्रमांक 01159 ही रात्री 11 वाजून 25 मिनिटांनी दिवा स्थानकातून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी चिपळूण येथे पोहोचेल. तर गाडी क्रमांक 01160 ही दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी चिपळूणहून सुटून रात्री 11:10 वाजता दिवा येथे येईल.
असे असतील याचे थांबे
या गाडीला दिवा, निळजे, तळोजे, कळंबोली, पनवेल, सोमटणे, आपटा, जिते, पेण, कासू, नागोठणे, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामने, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड, अंजनी आणि चिपळूण अशा अनेक स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
advertisement
ही गाडी पूर्णपणे जनरल असल्यामुळे प्रवाशांना आधी आरक्षण करण्याची गरज नाही. स्थानकावरील तिकीट खिडकीतून तिकीट घेऊन थेट प्रवास करता येईल. रात्री प्रवास करून सकाळी कोकणात पोहोचू इच्छिणाऱ्या चाकरमान्यांसाठी ही सेवा अत्यंत सोयीची ठरणार आहे. केवळ 8 दिवसांसाठी सुरू असलेल्या या विशेष फेरीचा लाभ प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
Konkan Railway : कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर; होळीसाठी धावणार विशेष मेमू रेल्वे; जाणून घ्या टाईमटेबल
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement