Vasai Crime: संशयाचे भूत डोक्यात शिरलं अन्...वसईत कॉलेज तरुणाचा काटा काढला; परिसरात खळबळ
Last Updated:
Vasai Crime News : प्रेमप्रकरणातून एका तरुणाला जीव गमवण्याची वेळ येता येता पाहिली आहे. मात्र या प्रकरणात नेमकं काय घडलं ते जाणून घ्या सविस्तर.
नालासोपारा : वसई पूर्वेतील मधुबन परिसरात एकतर्फी प्रेमातून एका तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
प्रेमात अडथळा ठरणाऱ्याचा 'काटा' काढण्याचा प्रयत्न
मिळालेल्या माहितीनुसार आदर्श शर्मा हा एका तरुणीवर एकतर्फी प्रेम करत होता. मात्र ती तरुणी दुसऱ्या तरुणाशी बोलत असल्याचा संशय त्याच्या मनात होता. याच कारणावरून त्याने राग धरला होता. दरम्यान तरुण कॉलेज सुटल्यानंतर रिक्षा स्टॉपकडे जात असताना ही घटना घडली.
मधुबन येथील ओलम्पस बिल्डिंगच्या गेटसमोर असलेल्या एका चहाच्या टपरीजवळ आरोपी आदर्श शर्मा आणि त्याचा एक साथीदार पांढऱ्या स्कुटरवरून आले. त्यांनी पीडीत तरुणाला रस्त्यात अडवून त्याच्याशी वाद घातला. वाद वाढताच आदर्श शर्माने पॅन्टच्या मागे लपवून ठेवलेला चाकू काढून तरुणावर वार केले. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
advertisement
घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. वालीव पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 21, 2026 12:24 PM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Vasai Crime: संशयाचे भूत डोक्यात शिरलं अन्...वसईत कॉलेज तरुणाचा काटा काढला; परिसरात खळबळ







