Amrut Bharat Express: पनवेलहून आजपासून सुटणार नवी अमृत भारत एक्सप्रेस, 2308 km अंतरासाठी फक्त इतकं भाडं; Timetableसह सर्व डिटेल्स
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
Panvel News: पनवेलवरून समस्तीपूरसह उत्तर बिहारवासीयांना आणखी एक नवीन रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळाली आहे. भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाकडून पनवेल- अलीपुरद्वार अमृत भारत एक्सप्रेसला आजपासून सुरूवात झाली आहे.
पनवेलवरून समस्तीपूरसह उत्तर बिहारवासीयांना आणखी एक नवीन रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळाली आहे. भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाकडून पनवेल- अलीपुरद्वार अमृत भारत एक्सप्रेस (DN-11031/ UP-11032) या ट्रेनला मान्यता मिळाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या ट्रेनला नुकताच हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. ही ट्रेन साप्ताहिक पद्धतीने चालवली जाणार आहे. सिलिगुडी जंक्शनवरून पंतप्रधानांनी या अमृत भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला आहे. या ट्रेनच्या टाईमटेबल आणि रेट कार्डवर एक नजर टाकूया...
पनवेल- अलीपुरद्वार अमृत भारत एक्सप्रेस मध्यप्रदेशातील सतना जंक्शन, कटनी जंक्शन, जबलपूर, पिपरिया, इटारसी मार्गे जाणार आहे. ट्रेन क्र. 11032 अप सिलिगुडी जंक्शन- पनवेल जंक्शन अमृत भारत एक्सप्रेसचं उद्घाटन आज (17 जानेवारी 2026) झालं. सिलिगुडी स्थानकावरून दुपारी 01:44 वाजता या एक्सप्रेसला पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला. आजपासून ही अमृत भारत एक्सप्रेस प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली असून पनवेल ते अलीपुरद्वार पर्यंतचे अंतर 2308 km पर्यंत आहे. इतक्या अंतरासाठी तुम्हाला 1200 ते 1300 रूपये पर्यंतचे दर आकारले जाणार आहेत. अमृत भारत एक्सप्रेसचे भाडे प्रति 1000 किलोमीटरचे सुमारे 500 रूपयापर्यंत आहे.
advertisement
पनवेल- अलीपुरद्वार अमृत भारत एक्सप्रेसचे थांबे, हासिमारा, बिन्नागुडी, सिलिगुडी, न्यू जलपाईगुडी जंक्शन, अलुबारी रोड जंक्शन, किशनगंज, बरसोई जंक्शन, कटिहार, नौगाचिया, मानसी जंक्शन, खगरिया जंक्शन, हसनपूर रोड, समस्तीपूर जंक्शन, मुझफ्फरपूर जंक्शन, हाजीपूर जंक्शन, सोनपूर, पाटलीपुत्र जंक्शन, दानापूर, अरा, बुक्सर, पंडीत दिनदयाल उपाध्याय जंक्शन, मिर्झापूर, मेजा रोड, प्रयागराज छेओकी, बारगढ, माणिकपूर, सतना जंक्शन, कटनी जंक्शन, जबलपूर, पिपरिया, इटारसी जंक्शन, भुसावळ जंक्शन, जळगाव जंक्शन, नाशिक रोड आणि कल्याण अशा मुख्य स्थानकांवर असणार आहेत. ट्रेन क्रमांक 11031 पनवेल जंक्शन-अलीपुरद्वार जंक्शन अमृत भारत एक्सप्रेस दर सोमवारी सकाळी 11:50 मिनिटांनी पनवेल जंक्शनवरून सुटेल आणि बुधवारी दुपारी 01:50 मिनिटांनी वाजता अलीपुरद्वार जंक्शन स्टेशनवर पोहोचेल. तर, ट्रेन क्रमांक 11032 अलीपुरद्वार जंक्शन- पनवेल जंक्शन अमृत भारत एक्सप्रेस दर गुरुवारी पहाटे 04:45 वाजता अलीपुरद्वार जंक्शनवरून सुटेल आणि शनिवारी पहाटे 05:30 वाजता पनवेल जंक्शन स्टेशनवर पोहोचेल.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
Jan 17, 2026 4:12 PM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Amrut Bharat Express: पनवेलहून आजपासून सुटणार नवी अमृत भारत एक्सप्रेस, 2308 km अंतरासाठी फक्त इतकं भाडं; Timetableसह सर्व डिटेल्स










