Success Story: नोकरीत कंटाळला, बिझनेस सुरू केला; कल्याणचा मनोज महिन्याकाठी कमावतोय हजारोंचा नफा
- Reported by:GEETA PANDHARINATH GAIKAR
- local18
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
नोकरीच्या बंधनात आणि महिन्याच्या पगारावर राहणे शक्य नसल्यामुळे मनोजला जॉब आणि कमी पगार यामुळे त्याला भविष्यात आवडीनिवडी पूर्ण करणं अशक्य असल्याचं कळताच त्याने नोकरीला राजीनामा दिला.
स्वप्नाचा पाठलाग केला की ते पूर्ण होतातच. हे सत्यात उतरवून दाखवणारा कल्याण तालुक्यातील चौरे गावचा तरुण उद्योजक मनोज ठाकरे शिक्षण पूर्ण झाल्यावर एका छोट्याशा पगारावर नोकरी करत होता परंतु नोकरीच्या बंधनात आणि महिन्याच्या पगारावर राहणे शक्य नसल्याने त्याला जॉब आणि कमी पगार त्यामुळे भविष्यात आवडीनिवडी पूर्ण करणं अशक्य आहे, हे कळताच त्यांनी नोकरीला राजीनामा दिला.
फॅशनेबल कपडे घालण्याची आवड पहिल्या पासूनच होती हीच आवड त्याच्या ब्रँडची आज ओळख ठरलीये. नोकरी नंतर स्वतःच कपड्यांचं दुकान सुरू केले. ग्राहकांचा रिस्पॉन्स चांगला मिळाल्याने आज मनोज यांनी कल्याणच्या नजीक टिटवाळ्यामध्ये दोन शॉप सुरु केले आहेत. गावकडची शेती खूप आणि शेतीतच करिअर करून शेवटपर्यंत नोकर म्हणून आणि हमालगिरीचे ओझे आयुष्यभर पेलवत राहणे परवडणारे नसल्याने वेळ असताच मार्ग बदलला तर नक्कीच प्रत्येक तरुण यशस्वी व्यावसायिक होऊ शकतो.
advertisement
हीच संकल्पना डोक्यात ठेऊन आज ठाकरे यांनी स्वतःचा ब्रँड सुरू केला. सुरुवातीला कपडे व्यवसायात पडण्यासाठी घरच्यांचा विरोध होता. परंतु स्वतः वर विश्वास आणि जिद्द ठेवून हा तरुण उद्योजक मेहनतीने उभा राहिला. मनोज ठाकरे यांनी गेल्या 5 वर्षात स्वतःचा कपड्यांचा ब्रँड सुरू केला. तो म्हणजे 'रॉयल रॉस्की' नावाचा ब्रँड. सध्या टिटवाळा कल्याणमध्ये त्या ब्रँडच्या जीन्स बघायला मिळतात. काही दिवसांपूर्वी एका ठिकाणी नोकर म्हणून काम करत असणारा तरुण आज स्वतःच्या ब्रँडचा आणि दोन शॉपचा मालक झाला आहे.
advertisement
रॉयल रॉस्की ब्रँडच्या जीन्स, टी शर्ट, पँट, शर्ट हे सर्वच रॉयल रॉस्की ब्रँड चे असतील. त्यामुळे स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी थांबू नका किंवा आपल्या कलेतून आपलं भविष्य उज्ज्वल होईल याकडेच लक्ष द्या.स्वप्न पूर्ण व्हायला वेळ लागेल पण कालांतराने ती पूर्ण होतील आणि आजच्या तरूणांनी वेळ आहेच तर ठरवावे करिअर कशात करायचे आहे. नुसत्या डिग्री आणि टाइमपास म्हणून जॉब करण्यापेक्षा जी स्वप्न आहेत त्याचा वेळीच पाठलाग करायला हवे.हाच संदेश मनोज ठाकरे यांनी आजच्या तरूणाईला दिला आहे.त्यामुळे आयुष्यात नोकर होण्यापेक्षा कधीतरी मालक होण्यासाठी ही प्रयत्न करावे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
Jan 16, 2026 10:00 PM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Success Story: नोकरीत कंटाळला, बिझनेस सुरू केला; कल्याणचा मनोज महिन्याकाठी कमावतोय हजारोंचा नफा







