advertisement

भिवंडी हादरली! पत्नीला ठार मारून पतीने पुरावे लपवले, पण ‘आईच्या मारेकऱ्याला’ मुलानेच केलं पोलिसांच्या ताब्यात

Last Updated:

Man kills Wife : भिवंडीतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चारित्र्यावर संशय घेत 48 वर्षीय पतीने स्वतःच्या पत्नीचा खून केला आहे. मुलाने पोलिसांत तक्रार दाखल करताच पडघा ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास सुरू आहे.

News18
News18
ठाणे : भिवंडी शहर पुन्हा एकदा धक्कादायक घटनेने हादरलं आहे. जिथे चारित्र्यावर संशय घेत पतीने स्वतःच्या पत्नीचा जीव घेतल्याची थरारक घटना समोर आली आहे. बापगाव परिसरात घडलेल्या या प्रकरणाने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
संशयाने घेतला संसाराचा बळी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला आणि तिचा मुलगा बापगाव भागात वास्तव्यास होते. आरोपी पती, त्यांचा मोठा मुलगा, सून आणि नातू हे दुसऱ्या ठिकाणी राहत होते. गेल्या काही महिन्यांपासून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद सुरू होता. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत आरोपीने अनेक वेळा मारहाण ही केली होती, असा शेजाऱ्यांचा आरोप आहे.
advertisement
पुरावे नष्ट करण्याचा डाव फसला
धक्कादायक म्हणजे घटनेच्या दोन दिवस आधीच आरोपीने आपल्या मुलाला आईला ठार मारण्याची धमकी दिली होती पण कुणालाही इतक्या टोकाचं पाऊल उचलेल असं वाटलं नव्हतं.
या प्रकरणी महिलेच्या मुलाने पडघा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. आरोपीचा शोध सुरू असून तो लवकरच पोलिसांच्या ताब्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे भिवंडी परिसरात शोककळा पसरली आहे.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
भिवंडी हादरली! पत्नीला ठार मारून पतीने पुरावे लपवले, पण ‘आईच्या मारेकऱ्याला’ मुलानेच केलं पोलिसांच्या ताब्यात
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement