Thane-Bhiwandi Bridge : ठाणे -भिवंडी 45 मिनिटांचा प्रवास होणार आता 5 मिनिटांत, कसं होणार शक्य?

Last Updated:

Thane–Bhiwandi 6-Lane Bridge : वसई खाडीवर उभारत असलेला सहा पदरी पूल ठाणे-भिवंडी प्रवास मोठ्या प्रमाणात सोपा करणार आहे. कोलशेत ते काल्हेर थेट जोडणी मिळाल्याने 45 मिनिटांचा प्रवास आता काही मिनिटांत पूर्ण होईल आणि वाहतूक कोंडीही कमी होणार आहे.

News18
News18
मुबंई : ठाणे ते भिवंडी या दोन शहरात दररोज मोठ्या प्रमाणात नागरिक व्यवसायासाठी जात असल्याने इथं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. दररोज प्रवास करण्यासाठी नागरिकांना तब्बल 1 ते 2 दोन वाहतूक कोंडीत अडकावे लागेत. आता याच समस्येवर मोठा तोडगा निघाला आहे. नेमका या प्रवासात नेमका काय बदल होणार आहे त्याचा फायदा नागरिकांना कसा होणार आहे या बाबत सविस्तर माहिती पाहूयात.
ठाणे-भिवंडी अंतर होणार चुटकीसरशी पार
सध्या ठाणे ते भिवंडी प्रवास करण्यासाठी साधारण 45 मिनिटांचा वेळ लागतो. कारण वाहनांना बाळकुम नाका आणि कशेळी पुलातून वळसा घालून जावे लागते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वेळ वाया जातो आणि तिथे सतत वाहतूक कोंडीही होते. मात्र, आता एमएमआरडीए वसई खाडीवर सहा पदरी पूल उभारणार आहेत,ज्यामुळे ठाण्यातील कोलशेत आणि भिवंडीतील काल्हेर ही दोन महत्त्वाची ठिकाणं थेट जोडली जातील.
advertisement
नेमकं किती मिनिटांत होणार आतंर पार?
नव्या पुलामुळे हा 45 मिनिटांचा प्रवास आता फक्त 5 ते 7 मिनिटांत पूर्ण होईल. वसई खाडीवर उभारला जाणारा हा पूल साधारण 2.2 किलोमीटर लांबीचा असून त्यासाठी तब्बल 430 कोटी रुपये खर्च होणे अपेक्षित आहे. या पुलासाठी गुरुवारी निविदा काढण्यात आल्या असून तीन वर्षांत बांधकाम पूर्ण होणे अपेक्षित सांगितले गेले आहे.
advertisement
इतकेच नव्हे तर भिवंडीमध्ये मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे स्थानकही होणार असल्याने या भागाचे महत्त्व आणखी वाढणार आहे. उद्योग आणि लॉजिस्टिकच्या दृष्टीने भिवंडी हा महत्त्वाचा केंद्रबिंदू मानला जात आहे, त्यामुळे नवीन पूल हा ठाणे आणि भिवंडी या दोन्ही शहरांच्या विकासासाठी मोठा टप्पा ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
Thane-Bhiwandi Bridge : ठाणे -भिवंडी 45 मिनिटांचा प्रवास होणार आता 5 मिनिटांत, कसं होणार शक्य?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement