आरोपींचं पुणे कनेक्शन, जरांगेंचा घणाघात, नार्को टेस्ट करण्याची मागणी

Last Updated : क्राइम
बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण चांगलंच तापलंय. या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ परभणीत महामोर्चा काढण्यात येणार आहे. नूतन महाविद्यालय मैदानापासून या मोर्चाला सुरुवात होईल. या मोर्चासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासह, बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर, यांच्यासह अनेक नेतेमंडळीही उपस्थित राहणार आहेत. माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी अनेक वक्तव्य केली या प्रकरणातील सर्व आरोपींची नार्को टेस्ट करा,नार्कोटेस्टमध्ये सरकारमधील कोणत्या मंत्र्यांची नावं येतात ते पाहा, कोणत्या नेत्याचा सहभाग आहे हे कळेल असं वक्तव्य त्यांनी केलं. आरोपी पुण्यात कसे सापडत आहेत? त्याला राजकीय पाठबळ दिसतंय. सरकारमधील मंत्री आरोपींना कुठे लपवायचं हे शिकवत होते, आरोपींना लपवणं म्हणजे हत्येच्या कटात सामील होणं असं त्यांनी म्हटलं.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/क्राइम/
आरोपींचं पुणे कनेक्शन, जरांगेंचा घणाघात, नार्को टेस्ट करण्याची मागणी
advertisement
advertisement
advertisement