Bollywood Song : 'कृष्णा' चित्रपटातील हे गाणं आहे. हे गाणं होते 'झांजरिया'. हे गाणं प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस पडले होते. चित्रपटात अभिनेता सुनील शेट्टी आणि करिश्मा कपूर मुख्य भूमिकेत आहेत. सुनील शेट्टी हा एका सामान्य कुटुंबातील मुलगा आहे जो पायलट असतो. तो एका ड्रग तस्करी टोळीच्या जाळ्यात अडकतो आणि पुरावे नसल्याने त्याला अटक केली जाते. तर करिश्मा कपूर ही क्लब डान्सर असते. सुनील शेट्टी जेल मधून बाहेर आल्यावर ड्रग्ज माफियांना संपवण्यासाठी कृष्णा नाव धारण करतो. हा चित्रपट खरंतर अॅक्शन, हायहोल्टेज ड्रामा आणि रोमान्सने भरलेला आहे. हे झांजरिया गाणं गायक अभिजीत भट्टाचार्य यांनी गायले. तर गाण्याला अन्नू मलिक यांनी संगीत दिले आहे.
Last Updated: December 06, 2025, 13:31 IST