पुणे : संध्याकाळ झाली की, आपण घराच्या खिडक्या लावून घेतो. कारण डास चावणं अगदी क्षणिक वेदना देणारं असलं तरी त्यातून गंभीर असे विषाणूजन्य आजार पसरतात. चिकनगुनिया तापही डास चावल्यामुळेच होतो. साधारण 3 ते 4 दिवस थंडी वाजून येणाऱ्या या तापामुळे एवढी असह्य सांधेदुखी होते की, चालताही येत नाही. लहान मुलं आणि वृद्ध व्यक्तींना याचा खूप त्रास होऊ शकतो. हा ताप नेमका कशामुळे येतो आणि कशी काळजी घ्यावी याबाबत माहिती दिलीये डॉ. सचिन पवार यांनी.



