कोल्हापूर : लग्न ही माणसाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची घटना असते. त्यामुळेच लग्नानंतर ज्या दोघांना एकत्र आयुष्य घालवायचा आहे, त्यांच्या पत्रिका जुळवून पाहिल्या जातात. संबंधित मुलगा आणि मुलगी यांचे किती गुण जुळतात, हे पाहिले जाते. जर हे गुण जुळले नाहीत किंवा अत्यंत कमी गुण जुळले असतील, तर पुढे त्यांच्या संसारात प्रचंड विघ्न येत असल्याचे ज्योतिषशास्रानुसार सांगितले जाते. मात्र वधू-वरांची पत्रिका जुळवताना कमीत कमी किती गुण जुळणे गरजेचे आहे, तसेच त्यांनी किमान कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबाबत कोल्हापूरमधील गुरुजी अरविंद वेदांते यांनी माहिती दिली आहे.



