Breast Cancer : व्यायामांमुळे स्तनांच्या कर्करोगाचा धोका कमी, संशोधनातून महत्त्वाची निरीक्षणं समोर, जाणून घ्या तब्येतीसाठी व्यायामाचे फायदे
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
नियमितपणे क्रिडा प्रकार आणि व्यायाम करत असलेल्या किशोरवयीन मुली नकळतपणे स्तनाच्या कर्करोगाच्या धोक्यापासून स्वतःचं संरक्षण करतात. अमेरिकेतील कोलंबिया युनिव्हर्सिटी मेलमन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या संशोधकांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे.
मुंबई : प्रकृतीसाठी व्यायाम करणं खूप महत्त्वाचं आहे. याचं शरीरासाठी महत्त्व आहेच तसंच काही रोगांना, व्याधींनाही यामुळे दूर ठेवणं शक्य होऊ शकतं.
व्यायाम केल्यानं स्तनांच्या कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो असं एका संशोधनातून समोर आलंय. विशेषत: किशोरावस्थेतली एक साधी सवय भविष्यात कर्करोगासारख्या गंभीर आजारांना रोखू शकते का? यावर हा अभ्यास करण्यात आला होता. नियमितपणे क्रिडा प्रकार आणि व्यायाम करत असलेल्या किशोरवयीन मुली नकळतपणे स्तनाच्या कर्करोगाच्या धोक्यापासून स्वतःचं संरक्षण करतात. अमेरिकेतील कोलंबिया युनिव्हर्सिटी मेलमन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या संशोधकांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे.
advertisement
Recreational Exerciseमुळे केवळ शरीर तंदुरुस्त राहत नाही तर किशोरवयीन मुलींमधे स्तनाच्या ऊतींच्या संरचनेवर आणि तणावाच्या बायोमार्कर्सवरही त्याचा सकारात्मक परिणाम होतो. शारीरिक हालचाली स्तनाच्या ऊतींच्या संरचनेशी आणि शरीरातील ताण पातळी मोजणाऱ्या सिग्नलशी थेट संबंधित आहेत असं या संशोधनातून प्रामुख्यानं दिसून आलं.
advertisement
आठवड्यातून दोन तास व्यायाम करणं अत्यंत प्रभावी असल्याचं या अभ्यासाच्या निष्कर्षातून स्पष्ट होतंय. संशोधकांना असे आढळून आले की ज्या मुलींनी मागील आठवड्यात किमान दोन तासांच्या Recreational Exercise मध्ये भाग घेतला त्यांच्यात सकारात्मक बदल दिसून आले.
- स्तनाच्या ऊतींमधे पाण्याचं प्रमाण कमी होणं: व्यायाम करणाऱ्या मुलींच्या स्तनाच्या ऊतींमध्ये पाण्याचं प्रमाण कमी असल्याचं आढळून आलं.
advertisement
- स्तनांची घनता कमी : कमी पाण्याचं प्रमाण हे स्तनांची घनता कमी असल्याचे लक्षण आहे, ज्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो.
- कमी ताण: या मुलींच्या युरिनरी बायोमार्करमध्ये तणावाची पातळी कमी असल्याचं आढळून आलं.
हा महत्त्वाचा निष्कर्ष 'ब्रेस्ट कॅन्सर रिसर्च' या प्रसिद्ध जर्नलमधे प्रकाशित झाला. कोलंबिया मेलमन स्कूलच्या सहाय्यक प्राध्यापक रेबेका केहम यांनी या संशोधनाचं महत्त्व सांगितलं. आज तरुणींमध्ये स्तनाच्या कर्करोगाचं प्रमाण वाढतंय, तर किशोरवयीन मुलींमध्ये शारीरिक हालचालींचं प्रमाण कमी होतंय. म्हणून, हे संशोधन अत्यंत महत्त्वाचं आहे.
advertisement
व्यायामाचा स्तनाच्या ऊतींच्या संरचनेवर थेट परिणाम होतो. चांगल्या व्यायामामुळे मॅमोग्राफिक स्तनांची घनता कमी होते हा आधीच्या अभ्यासालाही त्यांनी समर्थन दिलंय. वैद्यकीयदृष्ट्या, स्तनांची घनता कमी असेल तर स्तनांच्या कर्करोगाची जोखीम कमी होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 22, 2026 2:10 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Breast Cancer : व्यायामांमुळे स्तनांच्या कर्करोगाचा धोका कमी, संशोधनातून महत्त्वाची निरीक्षणं समोर, जाणून घ्या तब्येतीसाठी व्यायामाचे फायदे









