सांगलीच्या खानापूर तालुक्यातील भावळणी येथे एका फटाक्याच्या कारखान्यात मोठा स्फोट झाल्याची घटना घडली.हा स्फोट इतका मोठा होता की आवाजाने भावळणी गाव आणि आसपासचा 5 किलोमीटर परिसर हादरला. स्फोट झाल्यावर तेथील आसपास असलेल्या वाहनांच्या काचांना तडे गेले.तर गावातील घरांमधील कपाटे आणि भांडी खाली पडली.यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले.या घटनेनंनतर जखमींना तातडीने जवळच्या शासकीय रुग्नालयात दाखल करण्यात आले. अफ्ताफ मन्सुर मुल्ला आणि अमिन मुल्ला अशी जखमी इसमांची नावे आहेत.तेथील विटानगर परिषद आणि खानापूरच्या अग्निशमन दलाने वेळीच येऊन ही आग आटोक्यात आणली.
Last Updated: Dec 22, 2025, 20:25 IST


