रोहित पवार यांनी अजितदादांच्या विमान अपघातावर अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. हा अपघात नसून घातपात असल्याची शंका अधिक बळावत चालल्याचं ते म्हणाले. 22 दिवस उलटले तरीसुद्धा अजून तपासाला गती मिळत नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. यावेळी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी काही पुरावे काही प्रश्न समोर उपस्थित केले. त्यानंतर रोहित पवार यांच्या पत्नीनं काळजी व्यक्त केली आहे. इतक्या मोठ्या लोकांशी पंगा घेताय, तर काळजी वाटते असं कुटुंबियांनी बोलून दाखवल्याचं रोहित पवारांनी सांगितलं. भीतीपोटी आम्ही शांत बसलो तर आम्ही पवार कसले असंही रोहित पवार म्हणाले.



