तब्बल २० वर्षांनंतर 'सामना'मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी जाग्या केल्या आहे. 'माझा काका' या शीर्षकाखाली त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या 'दैनिक सामना' मध्ये राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या अनेक आठवणी सांगताना बाळासाहेब हा विषय विद्यापीठात शिकवणारा असल्याचे सांगितले.



