पाळीव प्राण्यांमध्ये कुत्रा हा सर्रास पाळला जाणारा प्राणी आहे. अनेकजण घराच्या संरक्षणासाठी आवर्जून श्वान पाळतात. परंतु, त्याच्या आहाराबाबत योग्य ती काळजी घेणं गरजेचं असतं. श्वानाच्या जातीवरून त्याचा आहार ठरतो. तसेच त्याच्या वजनानुसार आहार निश्चित केला जातो. याबाबत पुणे येथील डॉग फूड विक्रेते सागर देसले यांनी माहिती दिलीय.



