पुणे : सामाजिक कामाच्या माध्यमातून अनेक व्यक्ती विविध क्षेत्रांत योगदान देताना दिसतात. मात्र अभिनय कलेच्या जतनासाठी आणि प्रसारासाठी सातत्याने झटणारे पुण्यातील गिरीश मुरुडकर यांचे कार्य विशेष उल्लेखनीय ठरत आहे. संवाद लेखन, नाटक, नेपथ्य आणि रंगमंच या क्षेत्रांत 15 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेले गिरीश मुरुडकर गेली अनेक वर्षे अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत. अभिनय ही केवळ कला नसून व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम आहे, या विचारातून ते नव्या पिढीला रंगमंचाशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम करत आहेत.



