Sugar Free Chocolate Brownie : घरी बनवा हेल्दी आणि टेस्टी चॉकलेट ब्राऊनी, गोड तेही साखरेशिवाय! पाहा सोपी रेसिपी
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Guilt-Free Fudgy Chocolate Brownie Recipe : इंस्टाग्रामवर प्रेक्षा जैन हिने ही खास हेल्दी आणि टेस्टी रेसिपी शेअर केली आहे. या रेसिपीमध्ये डार्क चॉकलेट वापरले गेले आहे, ज्यामुळे ती अत्यंत हेल्दी असते आणि तुम्हाला गोड खाल्ल्याचा गिल्टही येणार नाही.
मुंबई : हल्ली लोक आपल्या फिटनेसविषयी खूप जागरूक झाले आहेत. त्यामुळे काय खावं, काय खाऊ नये आणि किती खावं याबद्दलही लोक खूप विचार करता. वजन कमी करणारे किंवा फिटनेस फ्रिक लोक तर गोड पदार्थ खाणं पूर्णपणे सोडतात. पण तरीही कधीकधी काहीतरी गोड खावंसं वाटतंच. अशावेळी तुम्ही ही खास चॉकलेट ब्राऊनी रेसिपी ट्राय करू शकता.
इंस्टाग्रामवर प्रेक्षा जैन हिने ही खास हेल्दी आणि टेस्टी रेसिपी शेअर केली आहे. तिने हेल्दी, चांगल्या घटकांचा वापर करून खास चॉकलेट ब्राउनी बनवली आहे. या रेसिपीमध्ये डार्क चॉकलेट वापरले गेले आहे, ज्यामुळे ती अत्यंत हेल्दी असते आणि तुम्हाला गोड खाल्ल्याचा गिल्टही येणार नाही.
चॉकलेट ब्राउनी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
- गव्हाचे पीठ 2 टेबलस्पून
advertisement
- कोको पावडर (गोड नसलेले) 2 टेबलस्पून
- शुगर फ्री स्वीटनर 2 ते 3 टेबलस्पून
- बेकिंग पावडर 1/2 टीस्पून (किंवा चिमूटभर एनो)
- ग्रीक योगर्ट 1 कप
- दूध गरजेनुसार
- चॉकलेट चिप्स
- शुगर फ्री डार्क चॉकलेट 20 ते 30 ग्रॅम
- बटर किंवा दूध 1 ते 2 टीस्पून
advertisement
चॉकलेट ब्राउनी बनवण्याची पद्धत
एका भांड्यात सर्व कोरडे साहित्य एकत्र करा आणि चांगले मिसळा. ग्रीक योगर्ट आणि दूध हळूहळू घाला. घट्ट आणि गुळगुळीत बॅटर होईपर्यंत मिक्स करा. मध्यभागी चॉकलेट चिप्स घाला. नंतर ते बेक करा. तुम्ही एअर फ्रायरमध्ये बेक करत असाल तर 15 मिनिटांसाठी 160°C वर बेक करा. मायक्रोवेव्हमध्ये बेक करणार असाल तर 3 ते 5 मिनिटे बेक करा आणि थोड्या थोड्या वेळाने ते तपासत रहा.
advertisement
advertisement
शुगर फ्री डार्क चॉकलेट घ्या आणि ते थोडे बटर किंवा दुधासोबत वितळवा. गुळगुळीत आणि चमकदार होईपर्यंत ढवळत रहा. ब्राउनी बेक झाल्यावर वरतून चॉकलेट सॉस घाला आणि आनंद घ्या.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 05, 2026 1:26 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Sugar Free Chocolate Brownie : घरी बनवा हेल्दी आणि टेस्टी चॉकलेट ब्राऊनी, गोड तेही साखरेशिवाय! पाहा सोपी रेसिपी










