पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरातील दत्तनगर गुजरवाडी रोड वर एका तरुणाने दारूच्या नशेत धिंगाणा घातला. ही सगळी घटना १० डिसेंबर रोजी रात्री घडली असून सी सी टिव्ही मध्ये कैद झाली आहे. या तरुणाने एका किराणा दुकानात जात सिगरेट ची मागणी केली पण दुकानात सिगरेट आमच्याकडे मिळत नाही असं दुकानदाराने सांगताच त्या तरुणाने नशेत दुकानाचे नुकसान करायला सुरुवात केली. तसेच तिथे असलेल्या भाजीच्या टोपल्याने, कचऱ्याच्या डब्याने दुकानदाराला मारहाण करायला सुरुवात केली. संबंधित दुकानदाराने पोलिसात तक्रार दाखल केली आहे
Last Updated: December 11, 2025, 18:27 IST


