सातारा: काही आजारांबद्दल समाजात समज आणि गैरसमज असतात. कुष्ठरोगाबद्दल असे अनेक गैरसमज लोकांमध्ये आहेत. हा आजारा दैवी शाप आहे किंवा नवस न फेडल्याने कुष्ठरोग होतो, अशी अंधश्रद्धा काही लोकांमध्ये असते. पण कुष्ठरोग हा पूर्णपणे बरा होऊ शकणारा आजार असून काही लक्षणे आढळल्यास तात्काळ डॉक्टरांना दाखवण्याची गरज असते. कुष्ठरोग निवारणासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न केले जातात. महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनापासून म्हणजेच 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी या काळात कुष्ठरोग निवारण पंधरवडा साजरा केला जातो.
Last Updated: November 17, 2025, 20:35 IST