सोलापूर : महिलांवर दिवसेंदिवस वाढत असलेल्या अत्याचारांच्या घटना लक्षात घेऊन सोलापूर शहरातील संगमेश्वर कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या 17 वर्षीय दोन मुलींनी वूमन सेफ्टी शूज बनवले आहे. आरती पाटील आणि स्नेहा राठोड या दोन तरुणींनी हे शूज बनवले आहे. शूज परिधान करणाऱ्या महिलेला व्यक्तीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर त्याला विजेचा जोरदार धक्का बसतो आणि जवळपास चार तास बेशुद्ध होतो. या संदर्भात अधिक माहिती आरती पाटील यांनी लोकल 18 शी बोलताना दिली आहे.
Last Updated: Jan 05, 2026, 19:24 IST


