Paris Olympics 2024 : ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरने इतिहास घडवला, नीता अंबानींनी दिल्या शुभेच्छा

Author :
Last Updated : स्पोर्ट्स
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं मेडल मिळालं आहे. नेमबाजीमध्ये मनू भाकरने कांस्य पदक जिंकत इतिहास घडवला आहे. या विजयानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक सदस्य असलेल्या नीता अंबानी यांनी मनू भाकरचं अभिनंदन केलं आहे. अविश्वसनीय क्षण, आमच्या सर्वात तरुण महिला नेमबाजाने कांस्य पदक मिळवून भारताचं खातं उघडलं आहे. मनू भाकर, तुझं अभिनंदन. ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला नेमबाज म्हणून तू इतिहास घडवला आहेस. तुझं आजचं यश भारतातल्या युवा खेळाडूंना मोठी स्वप्न पाहण्यासाठी आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रेरित करतील. भारताचा ध्वज असाच उंच फडकवत ठेव, गो इंडिया गो, आम्हा सर्वांना तुझा अभिमान आहे, असं नीता अंबानी म्हणाल्या आहेत.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
Paris Olympics 2024 : ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरने इतिहास घडवला, नीता अंबानींनी दिल्या शुभेच्छा
advertisement
advertisement
advertisement