advertisement

ज्याची भीती होती तेच घडणार, जगभरात खळबळ घोंगावतंय मोठं संकट, उरले फक्त 48 तास

Last Updated:

अमेरिका आणि इराणमधील तणाव टोकाला पोहोचला असून, पँटागॉनच्या हालचालींमुळे जागतिक महायुद्धाची भीती वाढली आहे. डोनाल्ड ट्रम्प निर्णायक निर्णय घेऊ शकतात.

News18
News18
गेल्या काही दिवसांपासून ज्याची भीती होती अखेर तेच खरं होतंय की काय असं चित्र सध्या निर्माण झालं आहे. रशिया युक्रेन संघर्षानंतर आता अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचत आहे. जागतिक संकटाची भीती व्यक्त केली जात होती, ते आता उंबरठ्यावर येऊन ठेपलं आहे. अमेरिका आणि इराणमधील तणाव अशा वळणावर पोहोचला आहे, जिथून परतीचे सर्व मार्ग बंद होताना दिसत आहेत. राजनैतिक चर्चेसाठी आता केवळ ४८ ते ७२ तासांचा कालावधी उरल्याचे मानले जात असून, त्यानंतर पँटागॉनकडून मोठी लष्करी कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. या घडामोडींमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे.
पँटागॉनच्या हालचालींनी धाकधूक वाढली
अमेरिकेच्या संरक्षण विभागाकडून मिळणाऱ्या माहितीनुसार, येत्या तीन दिवसांत मध्य पूर्वेतील काही महत्त्वाच्या कर्मचाऱ्यांना तातडीने बाहेर काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इराणकडून होणाऱ्या संभाव्य पलटवाराचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. ही 'शिफ्टिंग' प्रक्रिया म्हणजे मोठ्या युद्धाची नांदी तर नाही ना? अशी शंका आता उपस्थित केली जात आहे.
advertisement
ट्रम्प यांचा अंतिम निर्णय शनिवारी?
अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अद्याप हल्ल्याच्या पत्रावर स्वाक्षरी केली नसली तरी, लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांना रेडी टू गो रिपोर्ट सादर केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या विकेंडला म्हणजेच शनिवारपर्यंत ट्रम्प मोठा निर्णय घेऊ शकतात. अणुऊर्जेच्या मुद्द्यावर इराणने माघार घेतली नाही, तर लष्करी बळाचा वापर करण्यावर ट्रम्प ठाम आहेत. यांच्यातील संघर्ष टोकाला गेला तर मात्र संपूर्ण जगभरात खळबळ उडाण आहे. सोनं चांदी महाग होईल, शेअर्स आपटतील आणि या व्यतिरिक्त नुकसान होईल ते वगळंच.
advertisement
इराणची हाय अलर्टवर
दुसरीकडे, इराणनेही कोणत्याही हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आपली कमान प्रणाली 'मोझॅक डिफेन्स' मोडवर आणली आहे. होर्मुजच्या सामुद्रधुनीजवळ इराणच्या नौदल तुकड्या तैनात झाल्या असून, अण्वस्त्र तळांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण तणावात रशियन युद्धनौकांचा सहभाग वाढल्याने या संकटाचे रूपांतर जागतिक महायुद्धात होते की काय, अशी भीती व्यक्त होत आहे.
advertisement
चर्चेची शेवटची संधीही धूसर?
जिनेव्हामध्ये अमेरिकन सल्लागार आणि इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये तीन तास खलबतं झाली. काही प्रगती झाल्याचा दावा केला जात असला तरी, दोन्ही बाजू आपापल्या अटींवर ठाम आहेत. "काही सीमा रेषा आहेत ज्या ओलांडल्या गेल्या तर युद्ध अटळ आहे," असे स्पष्ट संकेत अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस यांनी दिले आहेत. इस्रायलच्या लष्करी गुप्तचर विभागाचे माजी प्रमुख अमोस याडलिन यांनी म्हटले आहे की, "आम्ही युद्धाच्या जवळ आहोत." महासत्ता एका दिवसात युद्धात उतरत नसली तरी, डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार पाहता परिस्थिती कधीही स्फोटक होऊ शकते. अनेक स्तरांतून या युद्धाला विरोध होत असला तरी, पँटागॉनच्या हालचालींनी जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
ज्याची भीती होती तेच घडणार, जगभरात खळबळ घोंगावतंय मोठं संकट, उरले फक्त 48 तास
Next Article
advertisement
दलाल स्ट्रीटवर खळबळ, एका बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; झटक्यात 35,000 कोटींच्या शेअर्सची बंपर खरेदी
दलाल स्ट्रीटवर खळबळ, बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; 35,000 कोटींची खरेदी
  • शेअर मार्केटमध्ये भूकंप! पूर्ण 'गेम'च बदलला

  • बाजारात बड्या माशाने स्वस्तात उचलला माल

  • 35,000 कोटींची बंपर खरेदी

View All
advertisement