Bangkok Earthquake : 3 सेकंदांमध्ये कोसळली अख्खी इमारत, बँकॉकमध्ये भयानक भूकंप, थरकाप उडवणारा Video
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
थायलंडची राजधानी बँकॉक शुक्रवारी दुपारी 7.7 रिश्टर स्केलच्या भूकंपाने हादरली आहे. हा भूकंप इतका भयानक होता की बांधकाम सुरू असलेली उंच इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली
बँकॉक : थायलंडची राजधानी बँकॉक शुक्रवारी दुपारी 7.7 रिश्टर स्केलच्या भूकंपाने हादरली आहे. हा भूकंप इतका भयानक होता की बांधकाम सुरू असलेली उंच इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. इमारतीमध्ये 47 कामगार अडकल्याची माहिती समोर येत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये उंच इमारत कोसळली यानंतर धुळीचे लोट परिसरात पसरले. तसंच इमारत पडताना पाहून तिथे उपस्थित असलेले नागरिक किंचाळत आणि आक्रोश करत पळताना दिसत आहेत.
पोलिसांनी असोसिएटेड प्रेसला सांगितलं की बँकॉकच्या चटुचक मार्केटजवळ असलेल्या घटनास्थळी बचाव कार्य सुरू झालं आहे.
🚨BREAKING: A powerful 7.7 magnitude earthquake has struck Myanmar.
It's unclear how bad the damage is . Stay tuned for updates. pic.twitter.com/YWRDj4jS52
— Viral News NYC (@ViralNewsNYC) March 28, 2025
advertisement
सुरूवातीच्या वृत्तांनुसार अमेरिकन भूवैज्ञानिक सर्वेक्षण आणि जर्मनीच्या जीएफझेड भूविज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार दुपारी हा भूकंप 10 किमी (6.2 मील) खोल आला, ज्याचं केंद्र शेजारी देश म्यानमार होतं. म्यानमार शहरातल्या मोनीवा शहरापासून जवळपास 50 किमी पूर्व भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. ग्रेटर बँकॉक भागाची लोकसंख्या 1 कोटी 70 लाख एवढी आहे, ज्यातले बहुतेक लोक हे उंच इमारतींमध्ये राहतात.
advertisement
@AnilSinghvi_ @kunalsaraogi @iamrakeshbansal
7.7 earthquake, 10 km deep.
Location 96.12°E 22.07°N Myanmar
Tall buildings in Bangkok and the suburbs around.
Many other provinces in Thailand are also affected. pic.twitter.com/02wt2m1FlY
— Shailesh Trivedi (@smt630) March 28, 2025
स्थानिक वेळेनुसार दीड वाजता भूकंप झाल्यानंतर इमारतींचे अलार्म वाजायला सुरूवात झाली, यानंतर दाट लोकसंख्या असलेल्या बँकॉकच्या उंच इमारती आणि हॉटेलमधून लोक बाहेर यायला लागली. हा भूकंप इतका भयंकर होता की इमारती आणि हॉटेलमधल्या स्विमिंग पूलमधील पाण्यातूनही लाटा उसळल्या.
advertisement
भारतातही जाणवले धक्के
दरम्यान कोलकाता आणि आसपासच्या परिसरातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भूकंपामुळे शहरात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही. कोलकात्याशिवाय मणिपूर आणि इंफाळच्या थांगल मार्केटमध्ये भीतीचं वातावरण पसरलं, कारण परिसरात अनेक जुन्या बहुमजली इमारती आहेत.
view commentsLocation :
First Published :
March 28, 2025 2:22 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
Bangkok Earthquake : 3 सेकंदांमध्ये कोसळली अख्खी इमारत, बँकॉकमध्ये भयानक भूकंप, थरकाप उडवणारा Video


