73 वर्षांतला सर्वात मोठा भूकंप, 7 फूट उंच उसळल्या लाटा, भारताशेजारी त्सुनामीचा धोका
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
रशियाच्या कामचटका द्वीपकल्पात 8.7 रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे. त्सुनामीचा इशारा देण्यात आला असून रशिया, जपान, अमेरिका आणि चीनला फटका बसला आहे.
आजची पहाट संपूर्ण जगासाठी एक संकट घेऊन आली. एक घटनेनं संपूर्ण जगाला 73 वर्ष जुन्या आठवणी डोळ्यासमोर आल्या. 73 वर्षांतला सगळ्यात मोठा भूकंप पुन्हा एकदा पॅसिफिक महासागरात आला आहे. याचा फटका, रशिया आणि जपान नाही तर अमेरिका आणि चीनलाही बसला आहे.
आधी भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी रशिया आणि जपान हादरलं. हा भूकंप उथळ समुद्रात आल्याने त्सुनामीचा इशारा देण्यात आला. त्याची तीव्रता समुद्राच्या दिशेनं जास्त होती. या भूकंपानं संपूर्ण जगाला हादरवून टाकलं आहे. बुधवारी रशियाच्या कामचटका द्वीपकल्पात 8.7 रिश्टर स्केलचा भूकंप झाला, ज्याला स्थानिक प्रशासनाने दशकांमधील सर्वात शक्तिशाली भूकंप म्हटले आहे.
advertisement
हवाई के पश्चिम तट पर उठीं 7 फीट ऊंची लहरें#earthquakeinrussia #putin #Tsunami @anchorsapna pic.twitter.com/5Q8hfSAlq4
— News18 India (@News18India) July 30, 2025
या भूकंपानंतर, जपान, रशिया आणि पॅसिफिक बेटांवर त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की या भूकंपामुळे कुरिल बेटांवर 4 मीटर (13फूट) उंचीपर्यंत त्सुनामी आली. लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवावे लागले आणि इमारतींचे नुकसान झाले. यूएस जिओलॉजिकल सर्व्हे एजन्सीने पुष्टी केली आहे की भूकंपानंतर त्सुनामीच्या लाटा उठल्या आहेत आणि अलास्काच्या काही भागात इशारा जारी करण्यात आला आहे.
advertisement
चीनच्या नैसर्गिक संसाधन मंत्रालयाच्या त्सुनामी चेतावणी केंद्राने गुरुवारी देशाच्या पूर्व किनारी भाग, शांघाय आणि झेजियांग प्रांतांसाठी त्सुनामीचा इशारा जारी केला. या भागात १ ते ३ फूट उंचीच्या लाटा उसळू शकतात असा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
'कोमाई' वादळाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर हा इशारा देण्यात आला आहे, ज्यामुळे या किनारी भागात जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस पडून लाटा अधिक धोकादायक बनू शकतात.
शियामध्ये पहाटेच्या सुमारास 8.7 रिश्टर सेक्ल तीव्रतेचा भूकंप झाल्याने हाहाकार उडालाय. भूकंपाची तीव्रता इतकी मोठी होती की आता याठिकाणी त्सुनामीचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. जपान, हवाई, अलास्का भागात यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. सध्या याठिकाणी कुठलीहगी जीवितहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही. पण भूकंपामुळे मोठं नुकसान झालंय.
advertisement
भारतीय वेळेनुसार 30 जुलै सकाळी 4:54 वाजता आलेल्या या भूकंपाने संपूर्ण पॅसिफिक क्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रशिया, जपानमधील अनेक शहरांमध्ये तीव्र झटके बसले आहेत. अनेक घरांचं नुकसानही झालं. समुद्र किनाऱ्यालगतच्या भागांमध्ये पाणी शिरलं, त्यामुळे जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झालंय..
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 30, 2025 11:19 AM IST
मराठी बातम्या/विदेश/
73 वर्षांतला सर्वात मोठा भूकंप, 7 फूट उंच उसळल्या लाटा, भारताशेजारी त्सुनामीचा धोका


