पाकिस्तानचे 14 जवानांना ठार, 'ऑपरेशन सिंदूर'ला 24 तास होण्याआधी 'भाडोत्री फौजांना' IEDने उडवले
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
BLA Attack: बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने दोन हल्ल्यांमध्ये पाकिस्तान लष्कराच्या 14 जवानांना ठार मारले. पहिला हल्ला बोलनमध्ये आणि दुसरा केचमध्ये झाला. BLA ने पाकिस्तानी लष्कराला भाडोत्री फौज म्हटले आहे.
बलुचिस्तान: भारताने पाकव्याप्त काश्मीर (PoK) आणि पाकिस्तानात 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ला करण्यापूर्वी पाकिस्तानला बलूचिस्तानमध्ये मोठा धक्का बसला आहे. बलूचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA) ने दावा केला आहे की त्यांच्या स्वातंत्र्य सैनिकांनी दोन वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तान लष्कराच्या 14 जवानांना ठार मारले आहे.
BLA चे प्रवक्ते जियंद बलोच यांच्या माहितीनुसार, पहिला हल्ला बोलनच्या माच भागातील शोरकंद परिसरात झाला. या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर रिमोट कंट्रोल आयईडीद्वारे हल्ला करण्यात आला. या शक्तिशाली स्फोटात पाकिस्तानी लष्कराचे एक वाहन पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आणि 12 जवान जागीच ठार झाले. मारल्या गेलेल्यांमध्ये पाकिस्तानी लष्कराचा स्पेशल ऑपरेशन्स कमांडर तारिक इमरान आणि सुबेदार उमर फारूक यांचाही समावेश आहे.
advertisement
केचमध्ये बॉम्ब डिस्पोजल टीमवर हल्ला
दुसरा हल्ला केच जिल्ह्यातील कुलाग तिग्रान भागात झाला. येथे पाकिस्तानी लष्कराच्या बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाला लक्ष्य करण्यात आले. त्यांच्यावरही रिमोट आयईडीद्वारे हल्ला करण्यात आला. ज्यात आणखी दोन सैनिकांचा मृत्यू झाला.
भाडोत्री लष्कर
BLA ने आपल्या निवेदनात पाकिस्तानी लष्कराला भाडोत्री फौज असे संबोधले आहे. ते पुढे म्हणाले की, ही सेना कधी बंदरांची राखण करते, कधी कॉरिडॉरची आणि कधी विदेशी कर्जदारांच्या सेवेत तत्पर असते. संघटनेने इशारा दिला आहे की, या प्रकारचे हल्ले आता अधिक वेगाने आणि अधिक तीव्रतेने सुरू राहतील.
advertisement
बलुचिस्तानमध्ये होत असलेल्या या वाढत्या हल्ल्यांमुळे पाकिस्तानची सुरक्षा व्यवस्था धोक्यात आली आहे. एका बाजूला भारताकडून दहशतवादी तळांवर कारवाई होत असताना, दुसरीकडे देशांतर्गत अशांतता वाढत असल्याने पाकिस्तानची डोकेदुखी वाढली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 07, 2025 4:09 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
पाकिस्तानचे 14 जवानांना ठार, 'ऑपरेशन सिंदूर'ला 24 तास होण्याआधी 'भाडोत्री फौजांना' IEDने उडवले


