China Breaking News: चीन करणार हल्ला? भीषण युद्धाची तयारी, सकाळ सकाळी लढाऊ विमानांची मोठी घुसखोरी
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
China Fighter Jets: तैवानच्या हवाई आणि समुद्री हद्दीत चिनी लष्कराने मोठ्या प्रमाणावर घुसखोरी केली आहे. सकाळीच पाच लढाऊ विमाने आणि सात नौदल जहाजे तैवानच्या आसपास सक्रिय असल्याचे तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले.
ताइपेइ: तैवानच्या राष्ट्रीय संरक्षण मंत्रालयाने (MND) एक धक्कादायक आणि खळबळजनक माहिती दिली आहे. रविवारी MNDला देशाच्या आसपास 5 चिनी पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) विमानं आणि 7 पीपल्स लिबरेशन आर्मी नेव्ही (PLAN) नौदल जहाजं दिसले आहेत. एक्स वर एका पोस्टद्वारे ही माहिती देण्यात आली असून, मंत्रालयाने स्पष्ट केले की यासंदर्भात योग्य ती कारवाई करण्यात आली आहे.
MND ने एक्सवर लिहिले की, आज सकाळी 6 वाजेपर्यंत तैवानच्या आसपास PLA च्या पाच विमानांच्या उड्डाणांची आणि PLAN च्या सात जहाजांची नोंद झाली आहे. #ROCArmedForces ने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून तात्काळ कारवाई करण्यात आली आहे.
तैवान आणि चीनमधील वाढता तणाव
या घटनेच्या एक दिवस आधी शनिवारी MND ने आपल्या प्रदेशातील पाणथळ भागांमध्ये 11 चिनी लष्करी विमानं आणि सात नौदल जहाजं सक्रिय असल्याचे निदर्शनास आणले होते. तर शुक्रवारच्या दिवशी MND ने PLA च्या 20 विमानांची आणि PLAN च्या सात जहाजांची हालचाल आपल्या जलसीमेच्या आसपास निदर्शनास आणल्याचे म्हटले होते.
advertisement
तैवान आणि चीन यांच्यातील संघर्षाचे कारण काय?
PLA कडून सुरू असलेल्या सततच्या घुसखोरी व समुद्री मोहिमा तैवान आणि चीनमधील वाढत्या तणावाचे प्रत्यक्ष चित्र आहेत. या दोन्ही देशांमधील संबंध दीर्घकाळापासून भूराजकीय तणावाने ग्रासलेले आहेत. तैवान ज्याला अधिकृतपणे ‘रिपब्लिक ऑफ चायना (ROC) म्हणून ओळखले जाते. जे एक राजकीय आणि आर्थिक व्यवस्था असलेला स्वतंत्र प्रदेश आहे.
advertisement
चीनकडून ‘एक चीन’ नीतीचा अवलंब करत तैवानला आपलाच एक भाग मानतो आणि या भूमिकेवर सातत्याने ठाम आहे. बीजिंगचा दावा आहे की एकच चीन आहे आणि त्याची राजधानी बीजिंग आहे.
1949 पासून सुरू असलेला संघर्ष
तैवान-चीन यांच्यातील या संघर्षाची मुळे 1949 मध्ये समाप्त झालेल्या चिनी गृहयुद्धात आहेत. माओ झेडोंग यांच्या नेतृत्वाखालील कम्युनिस्ट पक्षाने मुख्य भूभागावरील चीनवर ताबा मिळवल्यानंतर रिपब्लिक ऑफ चायना (ROC) सरकार तैवानमध्ये स्थलांतरित झाली. तेव्हापासून बीजिंगने तैवानला चीनमध्ये एकत्र आणण्याचे आपले उद्दिष्ट कायम ठेवले आहे. यासाठी त्यांनी लष्करी, राजनैतिक आणि आर्थिक साधनांचा वापर करत तैवानवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचे स्थान कमी करण्याचे धोरण राबवले आहे.
advertisement
तैवानचा संघर्ष
view commentsया सर्व प्रयत्नांनंतरही तैवान आपली स्वतंत्र ओळख जपण्यास कटिबद्ध आहे. स्थानिक जनतेचा या स्वातंत्र्याला मजबूत पाठिंबा आहे. आंतरराष्ट्रीय दबाव असतानाही तैवान आपली सार्वभौमत्वाची भूमिका टिकवून आहे. MND पारदर्शकतेच्या आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अशा लष्करी हालचालींची नियमितपणे पाहणी करते आणि त्या सार्वजनिकरित्या जाहीर करत राहते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 03, 2025 7:38 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
China Breaking News: चीन करणार हल्ला? भीषण युद्धाची तयारी, सकाळ सकाळी लढाऊ विमानांची मोठी घुसखोरी


