विद्यार्थिनीचे युक्रेनियन तरुणासोबत तसले संबंध, खाजगी क्षण व्हायरल; विद्यापीठाचा धक्कादायक निर्णय

Last Updated:

Viral Video: चीनमधील डालियन पॉलिटेक्निक विद्यापीठाने एका विद्यार्थिनीला युक्रेनियन तरुणाशी कथित जवळीक दाखवणाऱ्या व्हिडीओवरून विद्यापीठातून हकालपट्टी केली आहे. विद्यापीठाने राष्ट्रीय प्रतिष्ठा धोक्यात आणि नैतिक मूल्यांचं उल्लंघन या कारणांवरून ही कठोर कारवाई केली.

News18
News18
बीजिंग: चीनमधील डालियन पॉलिटेक्निक विद्यापीठाने एका विद्यार्थिनीला परदेशी नागरिकाशी अयोग्य संबंध आणि राष्ट्रीय प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणाऱ्या वर्तनामुळे विद्यापीठातून हाकलून दिले, अशी माहिती साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या अहवालात देण्यात आली आहे.
ही कारवाई त्या विद्यार्थिनीबाबत एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर करण्यात आली. या व्हिडीओमध्ये ती विद्यार्थिनी एका युक्रेनियन व्हिडीओ गेम खेळणाऱ्या तरुणाशी अतिशय जवळीक साधत असल्याचे दिसून आले होते.
ईशान्य चीनमधील या विद्यापीठाने सार्वजनिकपणे एक निवेदन प्रसिद्ध करत विद्यार्थिनीचे पूर्ण नाव उघड केले आणि तिच्या हकालपट्टी मागील कारणे सविस्तरपणे सांगितली आहेत. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या अहवालानुसार, या निर्णयावर चीनच्या सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
advertisement
न्यू यॉर्क टाइम्सच्या स्वतंत्र अहवालानुसार- अनेकांनी सोशल मीडियावर दाखवून दिले की, विद्यापीठ कॅम्पसमध्ये लैंगिक छळ किंवा हल्ल्याच्या इतर प्रकरणांमध्ये जेव्हा आरोपी पुरुष असतो तेव्हा त्याच्यावर सौम्य कारवाई होते. त्यांनी या विद्यार्थिनीच्या सार्वजनिक अपमानाचा आणि तिच्या गोपनीयतेच्या उल्लंघनाचा तीव्र निषेध केला आणि ही कारवाई कठोर आणि भेदभावपूर्ण असल्याचे म्हटले. मात्र काही लोकांनी विद्यापीठाच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आणि त्या महिलेवर परदेशीयांप्रती अति आकर्षण असल्याचा आरोप केला.
advertisement
या प्रकरणात जर कुणी खरोखर राष्ट्रीय प्रतिष्ठेला धक्का दिला असेल, तर ती विद्यार्थिनी नव्हे जिच्या गोपनीयतेचा भंग झाला. तर ते लोक होते जे न्यायाच्या नावाखाली एका सामान्य स्त्रीचा ऑनलाइन अपमान करत राहिले आणि ते शैक्षणिक संस्थेचे प्रतिनिधी होते जे जुनाट नैतिकतेच्या निकषांवर तिला दोषी ठरवत होते, असे इफेंग या माध्यमावर प्रकाशित झालेल्या एका लेखात पेकिंग विद्यापीठाच्या कायदाशास्त्र विभागातील प्राध्यापक झाओ हाँग यांनी लिहिले आहे.
advertisement
विद्यापीठाच्या म्हणण्यानुसार, 16 डिसेंबर रोजी घडलेल्या या घटनेमुळे नकारात्मक प्रभाव पडला आहे. त्यांनी तपशीलवार माहिती दिली नाही. मात्र सांगितले की ही शिक्षा त्यांच्या नागरिक नैतिकतेविषयक नियमांनुसारच करण्यात आली आहे.
त्या नियमानुसार, जर एखादा विद्यार्थी परदेशीयांशी अयोग्य संबंध ठेवतो आणि राष्ट्रीय प्रतिष्ठा किंवा शाळेच्या प्रतिमेला धक्का पोहोचवतो, तर त्याच्याविरोधात कारवाई होऊ शकते. जी शिक्षा ‘डेमेरिट’ (गंभीर नोंद) पासून सुरुवात होऊन निष्कासनापर्यंत जाऊ शकते, हे त्यात नमूद आहे.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
विद्यार्थिनीचे युक्रेनियन तरुणासोबत तसले संबंध, खाजगी क्षण व्हायरल; विद्यापीठाचा धक्कादायक निर्णय
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement