Video: इराण नव्हे इस्रायलवर संतापले डोनाल्ड ट्रम्प; तोंडातून निघाला कधीही न वापरावा असा शब्द
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Donald Trump on Israel Iran: इस्रायल-इराण युद्धविरामाच्या गोंधळावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट आणि संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. करार होताच इस्रायलने मोठ्या प्रमाणावर बॉम्बहल्ला केल्याचा आरोप करत ट्रम्प म्हणाले, दोघांनाही काय चाललंय तेच समजत नाही!
न्यूयॉर्क: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराणमध्ये त्यांच्याच मध्यस्थीनं झालेल्या नाजूक युद्धविरामाच्या मोडण्याच्या शक्यतेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दोन्ही देशांवर त्यांनी नाराजी दर्शवली. विशेषतः इस्रायलवर त्यांनी कडक शब्दांत टीका केली.
डील झाल्यावर लगेच इस्रायलनं इतका मोठा बॉम्ब वर्षाव केला की, तसा मी आजवर पाहिलाच नव्हता, असं ट्रम्प यांनी संतापून सांगितलं. आम्ही डील केल्यानंतर 12 तास शांतता असेल असे म्हणालो. पण त्यांनी पहिल्याच तासात सगळं टाकून दिलं. त्यामुळे मी इस्रायलवर नाराज आहे. इराणवरही आहे, पण इस्रायलचं वागणं तर अत्यंत बेजबाबदार होतं.
advertisement
President Trump on Israel and Iran: "We basically have two countries that have been fighting so long and so hard that they don’t know what the fuck they’re doing." pic.twitter.com/xrztmebALZ
— CSPAN (@cspan) June 24, 2025
भारतातील कोणत्या भागाला म्हणतात ‘छोटं इराण’? देशात आहेत 3 ‘मिनी इस्रायल’
ट्रम्प पुढे म्हणाले, आपल्याकडे दोन देश आहेत जे इतक्या वर्षांपासून आणि इतक्या तीव्रतेनं लढत आले आहेत की त्यांना आता काय करत आहेत याचंच भान राहिलेलं नाही. तरीही ट्रम्प यांनी स्पष्ट केलं की युद्धविराम अधिकृतपणे मोडलेला नाही. पण इस्रायली हवाई हल्ल्यांनी कराराच्या आत्म्याचं उल्लंघन केलं आहे.
advertisement
यानंतर काही मिनिटांतच ट्रम्प यांनी ‘truthsocial’वर एक फटकाऱ्याने भरलेली पोस्ट केली – ISRAEL. DO NOT DROP THOSE BOMBS. IF YOU DO IT IS A MAJOR VIOLATION. BRING YOUR PILOTS HOME, NOW!
काही वेळानंतर त्यांनी दुसरी पोस्ट करत सांगितले की, इस्रायल आता इराणवर हल्ला करणार नाही आणि सर्व विमानं परत फिरणार आहेत. त्यांनी लिहिलं, ISRAEL is not going to attack Iran. All planes will turn around and head home, while doing a friendly ‘Plane Wave’ to Iran. Nobody will be hurt, the Ceasefire is in effect! Thank you for your attention to this matter!
advertisement
हा सारा प्रकार पाहता इस्रायल-इराण संघर्ष पुन्हा भडकण्याच्या उंबरठ्यावर आहे. आणि त्यात ट्रम्प यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 24, 2025 6:35 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
Video: इराण नव्हे इस्रायलवर संतापले डोनाल्ड ट्रम्प; तोंडातून निघाला कधीही न वापरावा असा शब्द


