प्रेम, ब्रेकअप अन् आता वेगळी चूल, ट्रम्प यांच्यासोबतच्या वादानंतर एलन मस्क यांची मोठी घोषणा, अमेरिकेच्या राजकारणात खळबळ
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Elon Musk New Political Party: जगातील सर्वात प्रसिद्ध उद्योगपतींपैकी एक असलेल्या एलन मस्क यांनी अमेरिकन राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
जगातील सर्वात प्रसिद्ध उद्योगपतींपैकी एक असलेल्या एलन मस्क यांनी अमेरिकन राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी वाद झाल्यानंतर काही दिवसांतच मस्क यांनी एका नवीन राजकीय पक्षाची स्थापना करण्याची घोषणा केली. या पक्षाचे नाव 'द अमेरिका पार्टी' असेल. शनिवारी मस्क यांनी त्यांच्या सोशल मीडिया साइट एक्सवर लिहिले की, 'आज अमेरिका पार्टीची स्थापना झाली आहे, जेणेकरून आम्ही तुमचे स्वातंत्र्य तुम्हाला परत करू शकू.' त्यांनी हे विधान अमेरिकन स्वातंत्र्य दिनानिमित्त (४ जुलै) पोस्ट केलेल्या एका सर्वेक्षणाशी जोडले.
सर्वेक्षणात मस्क यांनी लोकांना विचारले होते की, 'तुम्हाला द्विपक्षीय व्यवस्थेपासून स्वातंत्र्य हवे आहे का? आपण 'द अमेरिका पार्टी' स्थापन करावी का?' सर्वेक्षणात ६५.४% लोकांनी 'हो' असे उत्तर दिले, तर ३४.६% लोकांनी 'नाही' असे उत्तर दिले. या सर्वेक्षणाचा हवाला देत मस्क यांनी लिहिले की, '२:१ च्या प्रमाणात, जनतेने म्हटले आहे की त्यांना एक नवीन पक्ष हवा आहे आणि आता त्यांना तो मिळत आहे.'
advertisement
By a factor of 2 to 1, you want a new political party and you shall have it!
When it comes to bankrupting our country with waste & graft, we live in a one-party system, not a democracy.
Today, the America Party is formed to give you back your freedom. https://t.co/9K8AD04QQN
— Elon Musk (@elonmusk) July 5, 2025
advertisement
अमेरिकेच्या सध्याच्या राजकारणावर हल्ला चढवत मस्क म्हणाले, 'आपण लोकशाहीत राहत नाही, तर अशा पक्षाच्या राजवटीत राहतोय, जो देशाला विनाश आणि भ्रष्टाचाराकडे ढकलत आहे.' ट्रम्प यांच्याशी सार्वजनिक मतभेद झाल्यानंतर, मस्क यांनी अनेक वेळा संकेत दिले होते की ते एक नवीन पक्ष सुरू करू शकतात, परंतु आता त्यांनी थेट नवीन पक्षाची घोषणा केली आहे.
advertisement
आतापर्यंत 'द अमेरिका पक्षा'ची रूपरेषा, धोरणे किंवा संभाव्य उमेदवारांबद्दल काहीही स्पष्टता नाही. परंतु हे निश्चित आहे की एलन मस्कच्या राजकारणातील प्रवेशामुळे अमेरिकेतील राजकीय समीकरणं बदलू शकतात. तंत्रज्ञान आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी आग्रही असणाऱ्या मस्क यांनी अमेरिकन जनतेच्या मोठ्या वर्गात आधीच लोकप्रियता मिळवली आहे. ट्रम्प यांना निवडून आणण्यात देखील त्यांनी मोठी भूमिका बजावली होती. आता ते स्वत: निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत.
Location :
Delhi
First Published :
July 06, 2025 6:58 AM IST
मराठी बातम्या/विदेश/
प्रेम, ब्रेकअप अन् आता वेगळी चूल, ट्रम्प यांच्यासोबतच्या वादानंतर एलन मस्क यांची मोठी घोषणा, अमेरिकेच्या राजकारणात खळबळ