Ex President Arrest : पत्नीच्या 'स्पेशल डे' साठी 2 वर्षांपूर्वीचा लंडन दौरा पडला महागात , माजी राष्ट्रपतीला अटक

Last Updated:

Ranil Wickremesinghe Arrested : दोन वर्षांपूर्वी पत्नीच्या खास दिवसासाठी केलेली लंडनवारी ही माजी राष्ट्राध्यक्षाला चांगलीच महागात पडली आहे. या लंडन दौऱ्याच्या खर्चाच्या मुद्यावरुन अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

ranil wickremesinghe
ranil wickremesinghe
नवी दिल्ली: दोन वर्षांपूर्वी पत्नीच्या खास दिवसासाठी केलेली लंडनवारी ही माजी राष्ट्राध्यक्षाला चांगलीच महागात पडली आहे. या लंडन दौऱ्याच्या खर्चाच्या मुद्यावरुन अटकेची कारवाई करण्यात आली आहे. श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना पोलिसांनी सरकारी निधीचा दुरुपयोग केल्याप्रकरणी अटकेची कारवाई केली आहे.
वृत्तसंस्था एएफपीने एका पोलिस अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, विक्रमसिंघे शुक्रवारी त्यांच्या 2023 च्या लंडन दौऱ्याशी संबंधित चौकशीसाठी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागात पोहोचले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. रानिल 2023 मध्ये राष्ट्रपती असताना त्यांच्या पत्नी प्राध्यापक मैत्री विक्रमसिंघे यांच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहण्यासाठी लंडनला गेले होते.

विक्रमसिंघेंनी आरोप फेटाळून लावले...

advertisement
वर्ष 2023 मध्ये, हवानाहून परतताना, विक्रमसिंघे लंडनमध्ये थांबले होते. विक्रमसिंघे यांनी त्या ठिकाणी जी-7 शिखर परिषदेत सहभाग घेतला होता. त्यादरम्यान ते आणि त्यांची पत्नी मैत्री वोल्व्हरहॅम्प्टन विद्यापीठातील एका कार्यक्रमात सहभागी झाले होते.
विक्रमसिंघे म्हणाले होते की त्यांच्या पत्नीने त्यांच्या प्रवासाचा खर्च स्वतः उचलला होता आणि त्यात कोणताही सरकारी पैसा वापरला गेला नाही. मात्र, पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने विक्रमसिंघे यांनी वैयक्तिक प्रवासासाठी सरकारी पैसे वापरले असल्याचा आरोप केला आहे. यासोबतच, त्यांनी त्यांच्या वैयक्तिक अंगरक्षकाला सरकारी तिजोरीतून पगारही दिला. शुक्रवारी सकाळी त्यांना या प्रकरणात जबाब देण्यासाठी बोलावण्यात आले, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
advertisement

2022 मध्ये झाले होते राष्ट्रपती...

जुलै 2022 मध्ये गोटाबाया राजपक्षे यांनी राजीनामा दिल्यानंतर उर्वरित कार्यकाळासाठी विक्रमसिंघे यांच्याकडे राष्ट्रपतीपदाची सूत्रे हाती आली. भ्रष्टाचार, महागाई आणि अनागोंदी कारभाराच्या विरोधात जनतेच्या असंतोषाचा आगडोंब उसळला होता. अखेर अनेक महिन्यांच्या निदर्शनांनंतर राजपक्षे यांनी पद सोडले.
श्रीलंकेतील आतापर्यंतच्या सर्वात वाईट आर्थिक मंदीनंतर अर्थव्यवस्था स्थिर करण्याचे श्रेय विक्रमसिंघे यांना जाते. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या दुसऱ्या फेरीत डाव्या विचारसरणीच्या ए.के. दिसानायके यांच्याकडून विक्रमसिंघे यांचा पराभव झाला.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
Ex President Arrest : पत्नीच्या 'स्पेशल डे' साठी 2 वर्षांपूर्वीचा लंडन दौरा पडला महागात , माजी राष्ट्रपतीला अटक
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement