Leap Of Love: हृदय थरारून जाईल, बापाने लेकीचा जीव वाचवण्यासाठी महासागरात उडी मारली; धाडसी क्षणाचा हृदयस्पर्शी Video व्हायरल
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Dad Jumps Into Ocean: समुद्रात पडलेल्या आपल्या पाच वर्षांच्या मुलीला वाचवण्यासाठी एका वडिलांनी 'डिस्ने ड्रीम' क्रूझच्या चौथ्या मजल्यावरून क्षणाचाही विचार न करता समुद्रात उडी घेतली. ही धाडसी कृती केवळ तिचा जीव वाचवणारी ठरली नाही, तर बापाच्या प्रेमाचं थरारक उदाहरण म्हणून व्हायरल होत आहे.
फ्लोरिडा: बहामासमधून दक्षिण फ्लोरिडाकडे परत येत असलेल्या 'डिस्ने ड्रीम' नावाच्या क्रूझ जहाजावर रविवारी एक हृदयद्रावक घटना घडली. जिथे एका 5 वर्षांच्या चिमुकलीचा जीव तिच्या वडिलांच्या धाडसी निर्णयामुळे वाचला. जहाजाच्या चौथ्या डेकवरून समुद्रात पडलेल्या आपल्या मुलीला वाचवण्यासाठी वडिलांनी क्षणाचाही विलंब न लावता समुद्रात उडी घेतली. या घटनेमुळे वडिलांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, ती लहान मुलगी बऱ्याच उंचीवरून अचानक समुद्रात पडली. हे पाहताच तिच्या वडिलांनी जराही विचार न करता तात्काळ समुद्रात उडी मारली. त्यावेळी जहाज इतक्या वेगाने पुढे जात होते की, 'समुद्रातील लोक लहान ठिपके बनून दृष्टीआड झाले,'असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. आपल्या मुलीला समुद्रात पडलेले पाहताच वडिलांनी तात्काळ उडी मारल्याचेही त्यांनी सांगितले.
advertisement
जहाजावर एकच गोंधळ उडाल्यानंतर, कॅप्टनने तात्काळ आपत्कालीन थांबा घेऊन जहाजाला मागे फिरवले आणि बचाव नौका (tender rescue boat) तैनात केली. प्रशिक्षित बचाव पथक वडील आणि मुलीच्या दिशेने वेगाने जात असताना क्रू सदस्यांनी समुद्रात लाईफ प्रेझर्व्हर्स (life preservers) फेकले.
NEW: Father jumps overboard to save his 5-year-old daughter, who fell off a Disney cruise ship from the 4th deck into the ocean.
The ship was heading back to South Florida when the intense rescue was made.
"The ship was moving quickly, so quickly, it's crazy how quickly the… pic.twitter.com/PTGmAzZJ7O
— Collin Rugg (@CollinRugg) June 30, 2025
advertisement
प्रवाशांनी शेअर केलेल्या व्हिडिओ क्लिप्समध्ये बचाव पथक वडिलांपर्यंत पोहोचल्याचा भावनिक क्षण कैद झाला आहे. त्यावेळी वडील आपल्या मुलीला घट्ट धरून पाण्यात तरंगताना दिसले. त्यांनी आपल्या मुलीला बचावकर्त्यांच्या हवाली केले आणि त्यानंतर ते स्वतः बचाव बोटीत चढले. दोघांनाही सुखरूप परत जहाजावर आणल्यानंतर उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून आणि रडून आपला आनंद व्यक्त केला.
advertisement
एका प्रवाशाने आठवण करून दिली, मी आईला रडताना पाहिले... पण जेव्हा त्यांना वाचवण्यात आले. तेव्हा खऱ्या अर्थाने अश्रू वाहू लागले. ते सुरक्षित आहेत हे जाणून खूप आनंद झाला. मी देवाला त्यांना वाचवण्यासाठी प्रार्थना केली आणि देवाने ती ऐकली.
डिस्ने क्रूझचे जलद प्रतिसादासाठी कौतुक
डिस्ने क्रूझ लाईनने एका निवेदनात आपल्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. ते म्हणाले, आम्ही आमच्या क्रू मेंबर्सच्या अपवादात्मक कौशल्ये आणि त्वरित कारवाईचे कौतुक करतो. ज्यामुळे दोन्ही पाहुण्यांना काही मिनिटांतच जहाजावर सुरक्षित परत आणले गेले. या घटनेमुळे त्यांच्या सुरक्षा प्रोटोकॉलची आणि संघाच्या व्यावसायिकतेची ताकद दिसून येते, असे कंपनीने सांगितले.
advertisement
हे जहाज सोमवारी सकाळी पोर्ट एव्हरग्लेड्स येथे पोहोचले. अनेक प्रवासी अजूनही भावनिकदृष्ट्या हादरलेले होते. परंतु त्यांनी पाहिलेल्या शौर्यामुळे ते खूप प्रभावित झाले होते. वडील आणि मुलीची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 01, 2025 6:26 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
Leap Of Love: हृदय थरारून जाईल, बापाने लेकीचा जीव वाचवण्यासाठी महासागरात उडी मारली; धाडसी क्षणाचा हृदयस्पर्शी Video व्हायरल


