इराणचा घातकी डाव, सिक्रेट संदेशानंतर संपूर्ण गेम बदलला; अमेरिका पुरती फसली, Gulf of Adenमध्ये बंडखोरांचे नवं तांडव

Last Updated:

Israel Iran Conflict: इराणचे सर्वोच्च नेता अयातुल्ला खामेनेई यांनी दिलेल्या संदेशानंतर येमेनमधील हूती बंडखोरांनी अदनच्या उपसागरात नवीन युद्धमोर्चा उघडला आहे. या कारवाईमुळे इराणवर हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या अमेरिकेच्या अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर नवी कोंडी उभी राहिली आहे.

News18
News18
तेहरान/तेल अवीव: एकीकडे इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध सुरू आहे. तर दुसरीकडे Gulf of Aden (एडनचे आखात)मध्ये येमेनमधील हूती बंडखोरांनी एक नवं युद्धभूमी उघडलं आहे. इराणच्या जवळच्या संबधित असलेल्या या हूती बंडखोरांची योजना मध्य पूर्वेत अमेरिकेला अडकवण्याची आहे. त्यामुळे इराणच्या इशाऱ्यावरच हूती बंडखोर या युद्धात उतरले असल्याचं मानलं जात आहे. कारण शंका व्यक्त केली जात आहे की अमेरिका कधीही इस्रायल-इराण युद्धात सहभागी होऊ शकतो. त्यामुळे अमेरिकेला इतरत्र गुंतवून ठेवण्यासाठी इराणची ही एक आखणी असू शकते.
अमेरिकेला अडकवण्याची नवी योजना
हूती बंडखोरांनी नवं मोर्चं उघडून आंतरराष्ट्रीय समीकरण अधिकच गुंतागुंतीचं केलं आहे. इराणसमर्थित हूती बंडखोरांनी एडनच्या उपसागरात पलाऊ झेंड्याखालील, युक्रेन मालकीच्या आणि पोलंडद्वारे चालवल्या जाणाऱ्या ‘एम/वी वर्बेना’ या मालवाहू जहाजावर दोन अँटी-शिप क्रूज क्षेपणास्त्र डागले. या हल्ल्यात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांड (CENTCOM) नुसार, जहाजाचं नुकसान झालं असून त्यात आग लागली आहे. जी नियंत्रित करण्याचा प्रयत्न चालक दल करत आहे.
advertisement
हा हल्ला हूतींच्या त्या रणनीतीचा भाग आहे. ज्यामध्ये ते गाझामधील इस्रायल-हमास युद्धाच्या समर्थनार्थ लाल समुद्र आणि अदनच्या उपसागरात जहाजांना लक्ष्य करत आहेत.
इराणचे ‘प्रॉक्सी’ 
हूती बंडखोरांना इराणचा प्रॉक्सी (प्रतिनिधी) मानलं जातं. त्यांचा हा हल्ला फक्त एक सैन्य कृती नसून इराणच्या व्यापक कूटनीतीचा भाग असल्याचं दिसतं. सध्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलने इराणच्या अणुठिकाण्यांवर हल्ले केले. त्याला उत्तर देत इराणनेही क्षेपणास्त्र हल्ले केले. अशा स्थितीत हूतींचा हल्ला हा अमेरिका या प्रादेशिक संघर्षात गुंतावा यासाठीचा प्रयत्न मानला जात आहे.
advertisement
विश्लेषकांचं म्हणणं आहे की, इराण या हल्ल्याद्वारे अमेरिकेचं लक्ष इस्रायल-इराण संघर्षातून हटवून लाल समुद्र व एडनच्या उपसागराकडे वळवू इच्छित आहे.
थेट युद्धात उतरण्याबाबत ट्रम्प संभ्रमात
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याआधीच स्पष्टपणे सांगितलं आहे की ते इस्रायल-इराण युद्धात उतरणार की नाही, याबाबत निश्चित नाहीत. अशा वेळी हूती बंडखोरांचे हे हल्ले अमेरिकेची सैन्य आणि राजनैतिक शक्ती यमनकडे वळवतील, ज्यामुळे इराणला इस्रायलविरोधात आपली स्थिती मजबूत करण्याची संधी मिळेल.
advertisement
अमेरिका आणि ब्रिटनने हूती बंडखोरांचे शस्त्रसाठे कमकुवत करण्यासाठी अनेक हवाई हल्ले केले, तरीही हूती हल्ले थांबताना दिसत नाहीत. मार्च महिन्यात ‘एम/वी ट्रू कॉन्फिडेन्स’ या जहाजावर झालेल्या हल्ल्यात तीन नाविकांचा मृत्यू झाला होता, हे त्याचं एक उदाहरण आहे.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
इराणचा घातकी डाव, सिक्रेट संदेशानंतर संपूर्ण गेम बदलला; अमेरिका पुरती फसली, Gulf of Adenमध्ये बंडखोरांचे नवं तांडव
Next Article
advertisement
Silver Price Prediction: गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्टने काय म्हटलं?
गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्ट
  • मागील वर्षात चांदीने गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न दिले.

  • चांदीच्या दरात मागील काही दिवसापूर्वी चांगलीच उसळण दिसून आली होती.

  • त्यानंतर गुंतवणूकदारांकडून गुंतवणुकीसाठी चांदीच्या पर्यायाकडे प्राधान्य दिले जात

View All
advertisement