IND VS PAK War: भारताचा पाकिस्तानवर मोठा प्रतिहल्ला: इस्लामाबाद, लाहोर, रावळपिंडीसह 3 हवाई तळांवर बॅलिस्टिक Missilesने धमाका

Last Updated:

India Strikes Air Force Bases: भारताने पाकिस्तानविरोधात इस्लामाबाद, लाहोर आणि रावळपिंडीतील हवाई तळांवर हल्ले केले. पाकिस्तानने भारतातील २६ ठिकाणी ड्रोन हल्ले केले होते. भारतीय दलांनी प्रत्युत्तरादाखल कारवाई केली.

News18
News18
इस्लामाबाद: भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने शनिवारी पहाटेच्या सुमारास पाकिस्तानविरोधात आघाडी उघडली. पाकिस्तानकडून झालेल्या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. संरक्षण सूत्रांनी सीएनएन-न्यूज१८ दिलेल्या माहितीनुसार या कारवाईत इस्लामाबाद, लाहोर आणि रावळपिंडी या प्रमुख शहरांसह तीन पाकिस्तानी हवाई तळांना लक्ष्य करण्यात आले.
पाकिस्तानच्या विविध शहरांमध्ये अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आले. यामध्ये रावळपिंडीत दोन, तर लाहोर आणि इस्लामाबादमध्ये प्रत्येकी एक स्फोट झाल्याचे समजते. याव्यतिरिक्त रावळपिंडीतील नूर खान हवाई तळ, पंजाब प्रांतातील शोरकोट येथील रफीकी हवाई तळ आणि पंजाबमधीलच चकवाल येथील मुरीद हवाई तळावरही हल्ले करण्यात आले.
पाकिस्तानच्या लष्कराचे प्रवक्ते, डायरेक्टर जनरल इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (DG ISPR) लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी नूर खान आणि रफीकी हवाई तळांवर भारताने हल्ला केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तथापि पाकिस्तानी हवाई दलाची (PAF) सर्व मालमत्ता सुरक्षित असल्याचा दावा त्यांनी केला. पाकिस्तानी सरकारने या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाले नसल्याचे म्हटले आहे.
advertisement
भारताने या हल्ल्यांसाठी हवेतून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा वापर केला. या कारवाईत पाकिस्तानची मोठी हवाई मालमत्ता निकामी झाली असून, त्यांना आपली यंत्रणा कार्यान्वित करता आली नाही, असेही सूत्रांनी सांगितले.
भारताच्या कारवाईची पार्श्वभूमी
शेजारील राष्ट्रांमध्ये वाढता तणाव असताना पाकिस्तानने शुक्रवारी भारतातील २६ ठिकाणी ड्रोन हल्ले केले होते. याच्या काही तासांतच भारताने ही प्रतिहत्त्याची कारवाई केली. भारतीय दलांनी पाकिस्तानकडून डागण्यात आलेली सहा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रेही यशस्वीरित्या रोखल्याचे सूत्रांनी सांगितले.
advertisement
पाकिस्तानी लष्कराने भारतीय लष्करी तळ आणि नागरी वस्त्यांवर अनेकदा हल्ले करण्याचा प्रयत्न केल्यानंतर भारताने ही प्रत्युत्तरादाखल कारवाई केली आहे. निष्पाप भारतीयांना ठार मारणाऱ्या दहशतवादी गटांच्या गुन्ह्यांसाठी त्यांच्या तळांवर हल्ला करण्यात आला. आम्ही पाकिस्तानी लष्करी प्रतिष्ठानांवर किंवा नागरी भागांवर हल्ला केलेला नाही. कालपासून पाकिस्तानचे प्रयत्न गुन्हेगारी स्वरूपाचे होते. त्यांनी भारतीय लष्कराच्या तळांवर अनेक हल्ले करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी भारतीय नागरी भागांवरही हल्ले केले. त्यांच्या गुन्ह्यांची यादी खूप मोठी आहे. भारत केवळ 'कस्टम मॅच अटॅक' करत आहे, असे सूत्रांनी नमूद केले.
advertisement
याआधी गुरुवारी रात्री भारताने देशाच्या उत्तर आणि पश्चिम भागांतील ३६ ठिकाणी पाकिस्तानने सोडलेले सुमारे ३००-४00 ड्रोन पाडले होते. पंजाबमधील फिरोझपूर येथे झालेल्या हल्ल्यात एका कुटुंबातील काही सदस्य जखमी झाले होते; रात्रीच्या अंधारात झालेल्या या हल्ल्यांमधील ही एकमेव ज्ञात जीवितहानी आहे. पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या सर्व राज्यांमध्ये वीजपुरवठा खंडित (ब्लॅकआऊट) करण्यात आला होता.
advertisement
परिस्थितीवर बारीक आणि सतत लक्ष ठेवले जात असून घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. भारतीय सशस्त्र दल उच्च सतर्कतेवर असून, अशा सर्व हवाई धोक्यांचा ड्रोनविरोधी यंत्रणा वापरून माग काढला जात आहे आणि त्यांना निष्प्रभ केले जात आहे, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
तणावाची सुरुवात
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ लोक ठार झाले होते. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सशस्त्र दलांनी बुधवारी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले होते. ज्यानंतर दोन्ही राष्ट्रांमधील तणाव वाढला आहे.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
IND VS PAK War: भारताचा पाकिस्तानवर मोठा प्रतिहल्ला: इस्लामाबाद, लाहोर, रावळपिंडीसह 3 हवाई तळांवर बॅलिस्टिक Missilesने धमाका
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement