उबदार कपडे काढून पुरुष अधिकाऱ्यांकडून तपासणी, US विमानतळावर 8 तास भारतीय बिझनेस वुमनसोबत गैरवर्तन
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
अमेरिकेतील अँकोरेज विमानतळावर भारतीय उद्योजिका श्रुती चतुर्वेदी यांना पावर बँक संशयावरून आठ तास ताब्यात ठेवून अपमानास्पद वागणूक देण्यात आली.
मुंबई: फोनची बॅटरी उतरल्यानंतर पटकन इमर्जन्सीसाठी फोन चार्ज व्हावा म्हणून पावर बँक वापरतो, मात्र तिच पावरबँक एका महिला उद्योजकासाठी मोठी अडचण ठरली. या पावरबँकमुळे तिच्यासोबत अत्यंत वाईट आणि अपमानास्पद वागणूक मिळाली. अमेरिकेतील अँकोरेज विमानतळावर एका भारतीय उद्योजिकेला तब्बल आठ तासांहून अधिक काळ ताब्यात ठेवत अत्यंत अपमानास्पद वागणूक दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. श्रुती चतुर्वेदी असे या उद्योजिकेचे नाव असून, त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर आपल्या अनुभवाची माहिती दिली आहे.
विमानतळावर त्यांच्या बॅगेतील पॉवर बँकवर संशय घेतल्यामुळे त्यांना अडवण्यात आलं आणि त्यानंतर त्यांच्यावर मानसिक आणि शारीरिक त्रास देणारी वागणूक झाली. श्रुती चतुर्वेदी यांच्या म्हणण्यानुसार, तपासणीदरम्यान त्यांनी स्पष्टपणे महिला अधिकाऱ्याची मागणी केली होती. मात्र, त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत पुरुष अधिकाऱ्यांकडून त्यांची शारीरिक तपासणी करण्यात आली. थंडी असतानाही त्यांचे गरम कपडे काढून घेण्यात आले. त्यांना स्वतःचा फोन वापरण्याची किंवा पाकीट हातात ठेवण्याचीही परवानगी देण्यात आली नाही.
advertisement
Dear friends in media who are running stories on this tweet without speaking to me once - please read! I was NOT stripped. I was stripped off my warm wear.
— Shruti Chaturvedi 🇮🇳 (@adhicutting) April 10, 2025
Dear friends in media who are running stories on this tweet without speaking to me once - please read! I was NOT stripped. I was stripped off my warm wear.
— Shruti Chaturvedi 🇮🇳 (@adhicutting) April 10, 2025
advertisement
एका थंड खोलीत त्यांना अनेक तास बसवून ठेवण्यात आलं आणि शौचालय वापरण्याचीही परवानगी नाकारण्यात आली. या सगळ्या प्रकारांमुळे त्यांची फ्लाईट चुकली. ही संपूर्ण तपासणी प्रक्रिया कॅमेऱ्यात रेकॉर्ड करण्यात आल्याचंही श्रुती यांनी नमूद केलं असून, हा अनुभव मानसिकदृष्ट्या अतिशय त्रासदायक ठरल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
त्यांनी भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला टॅग करत सवाल केला आहे की, “भारतीय नागरिकांना परदेशात सन्मानाने वागणुकीचा अधिकार नाही का? माझ्यासोबत अशी वागणूक का करण्यात आली?” या प्रकरणावर अमेरिकन विमानतळ प्रशासन किंवा भारत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 10, 2025 8:48 AM IST
मराठी बातम्या/विदेश/
उबदार कपडे काढून पुरुष अधिकाऱ्यांकडून तपासणी, US विमानतळावर 8 तास भारतीय बिझनेस वुमनसोबत गैरवर्तन


