Iran Attack On US: इराणने बदला घेतला, अमेरिकेवर हल्ला; थरकाप उडवणारा झटका- 2,000 सैनिकांचा जीव धोक्यात
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Iran Major Attack On America: इराणवर अमेरिकेच्या हवाई हल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सीरियातील अमेरिकन लष्करी तळावर क्षेपणास्त्र हल्ला झाला आहे. या घटनेनंतर मिडल ईस्टमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण होण्याची भीती वाढली आहे.
हसाका: इराणवर अमेरिकेच्या हवाई हल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सीरियामध्ये अमेरिकन लष्करी तळावर हल्ल्याची बातमी समोर आली आहे. सीरियाच्या पश्चिम हसाका प्रांतातील एका भागात असलेल्या अमेरिकन सैन्य अड्ड्याला लक्ष्य करण्यात आले आहे. यामुळे मिडल ईस्टमध्ये आणखी गोंधळ निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. कारण अमेरिकेने आधीच स्पष्ट केलं होतं की जर त्यांच्या लोकांना धोका पोहोचवण्याचा प्रयत्न झाला, तर ती कडक उत्तर देईल.
Mehrnews.com च्या रिपोर्टनुसार, या हल्ल्यात सध्या कोणत्याही जखमी किंवा मृत्यूची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र त्यामुळे तणाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. इराणी मीडियाने सूत्रांच्या हवाल्याने सांगितलं आहे की, सीरियाच्या अल-हसका प्रांतातील अमेरिकन लष्करी तळावर इराण समर्थित गटांनी क्षेपणास्त्र हल्ला केला.
advertisement
कुठे आहे अमेरिकन सैन्याची तैनाती?
view commentsअमेरिकन सैन्य 2014 पासून सीरियामध्ये तैनात आहे. त्यांचं प्रमुख उद्दिष्ट इस्लामिक स्टेट म्हणजेच आयएसआयएसचा नायनाट करणं आहे. सध्या अंदाजे 2,000 अमेरिकन सैनिक सीरियामध्ये तैनात आहेत आणि हे सैनिक उत्तर-पूर्व सीरियामधील कुर्द नेतृत्वाखालील Syrian Democratic Forces (SDF) सोबत काम करत आहेत. हे सैनिक अल-तनफ, शद्दादी, रुमालिन लँडिंग झोन आणि खराब अल-जिरसारख्या प्रमुख लष्करी ठिकाणांवर तैनात आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 23, 2025 8:24 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
Iran Attack On US: इराणने बदला घेतला, अमेरिकेवर हल्ला; थरकाप उडवणारा झटका- 2,000 सैनिकांचा जीव धोक्यात


